बॉलिवूडच्या या ५ सुपरस्टार बाबांनी आपल्या मुलांना दिले सर्वात महागडे गिफ्ट….

प्रत्येक आई- बाबा आपल्या मुलांच्या आवडी पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. सगळेच आईवडील आपल्या मुलांच्या आवडी पूर्ण करतात, मग सुपरस्टार त्याला कसे अपवाद असणार ? हे सुपरस्टार आपल्या मुलांना सतत काही न काही घेऊन देत असतात, बरेचदा त्या वस्तूंची मुलांना गरज असतेच असे नाही पण प्रेमापोटी या वस्तू घेऊन दिल्या जातात. तर पाहूया हे कोण आहेत

अभिषेक बच्चन– अमिताभ यांचे आपल्या नातीवर किती प्रेम आहे हे सगळेच जाणतात पण तुम्हाला हे माहिती आहे का की अभिषेक आणि ऐश्वर्याने त्यांची मुलगी आराध्या हिला तिच्या पहिल्या वाढदिवसाला २५ लाख रुपयांची मिनी कूपर कार घेऊन दिली होती, इतकेच नाही तर तिचा पहिला वाढदिवस हा दुबईत साजरा झाला आणि त्या पार्टीचा एकूण खर्च हा जवळपास ५४ कोटी इतका आला होता.

शाहरुख खान–  बॉलिवूडचा बादशहा आणि त्याची तिन्ही मुले यांना सगळेच ओळखतात. २००९ मध्ये सुट्टीत शाहरुख याने त्याच्या दोन मुलांना ६० लाख रुपयांची ऑडी कार गिफ्ट दिली होती.

सैफ अली खान– सैफ अली खान याचा मुलगा तैमुर याची चर्चा कायमच सोशल मिडीयावर चालू असते. हल्लीच बालदिनाच्या निमित्ताने सैफने त्याला एक JEEP कंपनीची कार भेट म्हणून दिली, ज्या जीपची किंमत १ कोटीपेक्षा जास्त आहे.

शाहिद कपूर– बॉलिवूड अभिनेता शाहिद याची मुलगी मिसा हिचा पहिला वाढदिवस लंडन येथे साजरा झाला. या पार्टीसाठी खूप पैसे खर्च केले गेले.

आदित्य चोप्रा– प्रसिद्ध दिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचा नवरा आदित्य याने त्याची मुलगी आदिरा हिला मुंबईत एक प्रशस्त बंगला भेट केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.