मराठमोळ्या तेजश्री प्रधानचे बॉलीवूड मध्ये पदार्पण! झळकणार या बॉलीवूड अभिनेत्या बरोबर…

“होणार सून मी या घरची” या मालिकेतून घराघरांत पोहचलेली आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता बॉलीवूड चित्रपटांत पदार्पण करत आहे. लवकरच ती बबलू बॅचलर या आगामी बॉलीवूड सिनेमातून प्रेक्षकांन समोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. तेजश्री चा हा पहिलाच बॉलीवूड चित्रपट आहे. ती प्रथमच अभिनेता शर्मन जोशी सोबत अभिनय साकारताना दिसणार आहे.

तेजश्री ने नुकतच हे पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. या पोस्टर मध्ये तेजश्री चा वधूच्या गेटअप मधील फोटो समोर आला आहे. या पोस्टर मध्ये शर्मन जोशी च्या एक साईड ला पूजा चोपडा आणि दुसऱ्या साईडला तेजश्री प्रधान दिसत आहे. 20 मार्च 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी आहेत. तर निर्माते अजय राजधाने आहेत. लखनऊ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित ‘बबलू बॅचलर’ हा कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा बबलू उर्फ शर्मनच्या लग्नाभोवती फिरताना दिसणार असल्याचे ट्रेलरवरुन समजते. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बबलूसोबत दोन वधू दाखवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.