राजा राणीची गं जोडी मालिकेतील बिनदास्त अश्या संजीवनी बद्दल बरेच काही…

नुकतीच कलर्स मराठी वरील राजा राणीची ग जोडी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत बिंदास इन्सपेक्टर ची भूमिका पाहायला मिळणार आहे. मालिकेतील नायिकेचे नाव संजीवनी उर्फ संजू अस आहे. संजू ही भूमिका बिनदास्त आणि काळजी करणाऱ्या मुलीची आहे. संजू ही भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार हिने साखारली आहे. त्यामुळे बिनदास्त अश्या अभिनेत्री विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

शिवानी सोनार हिचा जन्म पुणे येथे झाला. तिचे आईवडील सुद्धा पुण्यामध्ये राहतात. आपल्या आईवडीलांच्या सपोर्ट मुळेच अभिनय क्षेत्रात आपण पाउल टाकलं अस शिवानी सांगते. तिला एक छोटा भाऊ सुद्धा आहे. शिवानी तिच्या आयुष्यात बिनदास्त आणि एक प्रेम अशी मुलगी आहे. तिचे शालेय शिक्षण गर्ल्स हायस्कूल मधून पूर्ण झालं. पुढे MIT कॉलेज मधून तिने तीच उच्च शिक्षण पूर्ण केलं.

ललहानपणी पासूनच अभिनयाची आवड असल्याने शिवानी अभिनय क्षेत्रात वळाली. तिने थिएटर पासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. शिवणीने काही हिंदी शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे. ‘अग्निदास’ या हिंदी तर, ‘गाठभेट’ या मराठी शॉर्टफिल्म मध्ये तिने काम केलं आहे. तिने गर्जा महाराष्ट्र या मालिकेत पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे कालीन काशीबाई ची भूमिका साखारली होती. तिच्या कौशल्याने स्टार प्रवाह वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्मी नावच पात्र साखरल होत. दोन ऐतिहासिक मालिकेनंतर तिला कलर्स मराठी यांनी राजा राणीची ग जोडी या मालिकेत काम करण्याची संधी दिली. तर तुम्हाला शिवाणीचा अभिनय कसा वाटतो कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *