अमेरिकेतील शेतकरी गाईच्या पोटाला छिद्र का पाडतात, जाणून घ्या कारण

तुम्हाला माहीत आहे का अमेरिकेत गाईच्या पोटाला छिद्र का पाडतात? आणि या मागील विज्ञान? चला पाहुयात या मागील फायदे तोटे. मुळात तुम्हाला हे ऐकूनच आश्चर्य वाटले असेल की अमेरिकेत गाईंच्या पोटाला छिद्रे पाडली जातात. पण जरी हे विचित्र आणि भीतिदायक वाटत असलं तरी खरं आहे. मुळात यामध्ये विचित्र वाटून घेण्यासारखे काहीच नाही या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत, ज्या साठी अमेरिकेत गाईंच्या पोटाला छिद्रे केली जातात. महत्त्वाचे म्हणजे या मुळे गाईला काहीही धोका नसून, यांच्यामुळे गाईंचे आयुष्य वाढत असा वैज्ञानिकांनी दावा केला आहे.

लोकमत वृत्तपत्राच्या एक रिपोर्ट नुसार गाईंच्या पोटाला अश्या प्रकारे छिद्र अमेरिकेत सोबत अनेक वेगवेगळ्या देशात ही छिद्रे पडली जातात. भारतात ही गोष्ट पाहायला मिळत नाही म्हणून हे आपल्यासाठी थोडं विचित्र आणि भीतिदायक ठरू शकत. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे असे केल्याने गाईला किव्हा तिच्या आरोग्याला कोणतीही समस्या किव्हा अडचण न होता, उलट फायदाच होतो. मिळालेल्या माहिती नुसार एका युनिव्हर्सिटी मध्ये एक गाई 2002 पासून म्हणजे 16 वर्षांपासून  पोटावरील या छिद्रा सोबत जगत आहे. विशेष म्हणजे ही गाई ठणठणीत असून अजूनही काही वर्षे जगेल असे सांगण्यात येते.

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे छिद्र नेमकं कश्यासाठी? नक्की याचा उपयोग तरी काय? तर यांच उत्तर तुम्हाला मिळेल वैज्ञानिकांनी गाईच्या पचनतंत्राच्या अभ्यासाच्या उद्देशाने गाईच्या पोटात हे छिद्र केलं. पण त्याचे नंतर अनेक फायदे झाले.अमेरिकेचे शेतकरी नेहमी अश्या गाईच्या पोटात छिद्र करतात. या मागचा हेतू केवळ हा असतो की गाईच्या पोटाची आतून स्वच्छता करता यावी, व तीच आरोग्य चांगले राहावे. भारतात ज्या प्रमाणे गाई प्लास्टिक खाऊन मारतात,, तश्याच काही अडचणी अमेरिकेत सुद्धा उद्भवतात.

शेतकरी गाईंना चरण्यासाठी सोडतात तेव्हा या गाई प्लास्टिकच्या पिशव्या खातात, परिणामी त्यांना विविध त्रास होतात. परंतु गाईच्या पोटाला जर छिद्र असेल तर गाईच्या आतील पिशव्या अलगद बाहेर काढून घेता येतात. व गाईचे पोट स्वच्छ करता येते.आपण आपल्या बोली भाषेत जरी याला छिद्र म्हणत असलो तरी याला एक वैज्ञानिक नाव आहे. गाईच्या पोटाला केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियाला अथवा प्रक्रियेला कॅनूला अस म्हणतात. गाईच्या पोटावर हे छिद्र केल्यानंतर त्याला झाकून ठेवलं जातं. व जेव्हा गाईचे पोट स्वच्छ करायचे असेल ठेव्हा हे प्लास्टिक काढून स्वच्छ केलं जातं. वैज्ञानिकांच्या मते याने पोटाला कोणत्याही विजा होत नाहीत. त्याचबरोबर आयुष्यवरही याचा काही परिणाम होत नाही. एक रिपोर्ट नुसार ही क्रिया नवीन नसून 1920 पासून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *