राजा राणीची गं जोडी मालिकेतील संजीवनी बद्दल बरंच काही!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला राजा राणीची गं जोडी या मालिकेबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. “राजा राणीची गं जोडी” ही नवीन मालिका कलर्स मराठीवरती सुरू झाली आहे, या मालिकेमध्ये एक बिनदास आणि कडक इन्स्पेक्टरची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. मालिकेतील नायिकेचे नाव संजीवनी उर्फ संजू असे आहे. संजू ही भूमिका बिनदास व त्याच बरोबर जवाबदार अशा मुलगी आहे. आणि विशेष म्हणजे संजू ही भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार हिने साकारली आहे. त्यामुळे या बिनदास अशा अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

शिवानी सोनार हीच जन्म पुणे येथे झाला, तिचे आई वडील देखील पुणे मध्येच राहतात. आणि त्यांच्याच सपोर्टमुळे मी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले असे अभिनेत्री शिवानी सोनार सांगते. तिला एक छोटा भाऊ देखील आहे, आणि शिवानीचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव हा बिनदास व प्रेमळ असा आहे. तिचे शालेय शिक्षण “पी. एस. या गर्ल हायस्कुल मधून पूर्ण झाले, व पुढे एम. आय. टी. कॉलेजमधून तिने तिचे उच्च शिक्षण पूर्ण केले.

शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती आणि म्हणून शिवानी अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने थेटर पासून आपल्या अभिनयाची सुरवात केली, असंत कलावंत या थेटर पासून तिने आपल्या अभिनयाला सुरवात केली. व येवढेच न्हवे तर तिने काही हिंदी शॉर्ट फिल्म मध्ये देखील काम केले आहे, टी व्हाय, अग्निटस या हिंदी तर गडबेट या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये देखील काम केले आहे. तिच्या टी व्हाय या शॉर्ट फिल्म साठी अवॉर्ड देखील मिळाले आहेत. शॉर्ट फिल्म नंतर गरजा महाराष्ट्र या सोनी मराठीच्या मालिकेतुन शिवानीने टेलिव्हिजन वरती आपले पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे कालीन काशीबाईची भूमिका साकारली होती.

तिच्या अभिनयाच्या कौशल्यामुळे तिला स्टार प्रवाह वरील डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्मी नावाचे पात्र साकारले होते, अशा या दोन ऐतिहासिक भूमिकेनंतर कलर्स मराठीने शिवानील राजा राणीची गं जोडी या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. या मालिकेत प्रेक्षकांना शिवानी संजू या भूमिकेत पाहायला मिळते.
तर मित्रांनो तुम्हाला शिवानीचा अभिनय कसा वाटतो ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published.