शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत कसा व कोणत्या मराठी सरदाराने केला..

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या ‘mahiti.in’ या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला “मुकर्रबखानचा अंत कसा झाला व कोणत्या मराठी सरदाराने केला” याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. ज्या क्रूर मुकर्रबखानाने आपल्या शंभुराज्यांना कैद केले संगमेश्वर इथे कैद केले होते, त्याचा बदला कसा व कोणी घेतला याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेब बादशहाचे आक्रमण अधिकच तीव्र होत गेले. ते इतके की नवे छत्रपती ‘राजाराम महाराज’ यांना आपल्या काही सहकाऱ्यांसह “कर्नाटकात” आश्रय घ्यावा लागला. कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचा कारभार “रामचंद्र पंत”, “शंकराजी नारायण”, “संताजी घोरपडे”, व “धनाजी जाधव” या चौघांवर सोपवला होता. या चौघांनी संभाजी महाराज यांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रूशी लढण्याचा उत्साह पैदा केला…… आणि हळू हळू मोघलांच्या ताब्यात गेलेला मुलुख सोडविण्याचा प्रारंभ केला. ते विजया पाठीमागून  विजय मिळवतच गेले. प्रत्सुतचा मुकर्रबखानाच्या पाढावाचा प्रसंग, हा अशाच मराठांच्या विजयापैकी एक प्रारंभीचा विजय होय. याच विजयामुळे मराठ्यांचा विश्वास हा अनेक पटींनी वाढवला, व मराठी राज्य अजूनही तसेच जिवंत असल्याची जाणीव मराठ्यांनी औरंगजेबास करून दिली.

राजाराम महाराज हे मार्गावर असताना रामचंद्र पंतांनी पन्हाळ्यापासून वसंत गडापर्यंत लष्करी मोहीम काढून स्वराज्यातील मोघलांनी जिंकून घेतलेली अनेक गडकिल्ले सोढवली होती. तथापि मोघलांनी पुन्हा जोर करून आपल्या फौज या प्रदेशात घुसवून काही गडकिल्ले परत ताब्यात देखील घेतली होती, शेक निजाम ह्या ठाणेदाराने पुढे होऊन पुन्हा कोकणातील संगमेश्वर हे ठाणे जिंकले होते. आता मराठ्यांनी ही गडकिल्ले आपल्या कबज्यात आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली या मोहिमेचे नेतृत्व ‘रामचंद्र पंत’, ‘शंकराजी नारायण’ ‘संताजी घोरपडे’ आणि ‘धनाजी जाधव’ अशा चौघांनी केली होती. आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोघलांली जिंकून घेतलेले पाहिले संगमेशवर पुन्हा आपल्या ताब्यात आणणे हा होता.

संगमेशवर ठिकाणी असलेल्या “शेख निजामवर उर्फ मुकर्रबखान” याच्यावर ‘शंकराजी नारायण’ आणि ‘संताजी घोरपडे’ यांनी अचानक हल्ला केला. व छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जवाबदार असलेल्या शेख निजामवर केलेला हल्ला, हा इतका जोरदार होता की मुकर्रबखान म्हणजेच शेख निजाम काहीच करू शकला नाही. जखमी मुकर्रबखान जिवाच्या आकांताने पळत होता आणि संताजी घोरपडे त्याचा घोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व नारायण यांनी इतकी मारहाण केली की मुकर्रबखान हा इतिहासातूनच गायब झाला व तो म्हणजे कायमचाच आणि शेवटी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जवाबदार असणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत झाला.

मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.