‘हे’ नुकसान समजल्यानंतर तुम्ही चहासोबत बिस्किट खाणं आजपासूनच बंद कराल…

चहा आणि बिस्किटे हे एक प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. अनेक घरांत सकाळी चहाबरोबर बिस्किटे खाण्याची पद्धत आहे. इतकेच काय तर अनेक ऑफिसमध्ये अगदी मिटिंगना सुद्धा चहा बिस्किटे ठेवली जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही चहासोबत बिस्किट खाल्लीत तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते ? होय. याने तुमच्या आरोग्यावर परीणाम होतो आणि म्हणूनच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांच्या मिटिंगमध्ये चहासोबत बिस्किट न देण्याची विनंती केली आहे. तसेच बिस्किटांऐवजी काही पौष्टिक पदार्थ दिले जावेत अशीही विनंती केली आहे.

चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा परीणाम तुमचे दात तसेच तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. यांमुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा लहान वयात सुरकुत्या असे प्रकार होऊ शकतात.

जर तुम्ही चहासोबत गोड बिस्किटे म्हणजेच क्रीम बिस्किटे खाल्लीत तर तुमचे दात खराब होतात. यांमुळे दात किडणे, दातात पोकळ्या निर्माण होणे ह्या गोष्टी घडतात.

जर तुम्ही रोज चहा बिस्किटे घेत असाल तर तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते तसेच तुमचे वजन वाढण्याचा धोकाही असतो. सकाळी अतिरिक्त कॅलरीजचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते. बिस्किटांमध्ये जास्त साखर असते त्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परीणाम होतो

Leave a Reply

Your email address will not be published.