बिलेनियर पतीबरोबर या महालात राहते शिल्पा शेट्टी, अशा प्रकारे जगते लक्झरी जीवन…

जेव्हा माणूस दिवस रात्र काबाडकष्ट करतो तेव्हा त्याची सगळी स्वप्ने पूर्ण होतात. प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचे असते, त्यासाठी एकतर आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी बरीच मालमत्ता किंवा खजिना ठेवून गेलेले असले पाहिजेत किंवा आपण खूप मेहनत करून  ते निर्माण केले पाहिजे. आता बॉलीवुडच्या अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे चित्रपट तर नाहीत पण त्या लक्झरी आयुष्य जगतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाबतीत काही असे आहे. अलिशान महालात आपल्या पतीबरोबर एक लक्झरी आयुष्य जगत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा हे ४४ वर्षांचे आहेत. ते एक यशस्वी बिझिनेसमन असून त्यांचा व्यवसाय देशभरात बहरला आहे, ते त्यांचा वाढदिवस कुटुंबाबरोबर साजरा करत आहेत, शिल्पा दिसायला जेवढी सुंदर आहे तितकेच सुंदर ती आपले घर ठेवते, घराला सजवते. शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्र यांचे घर मुंबईतील जुहू येथे आहे. समुद्रकिनारी वसलेले यांचे घर खूप सुंदर असून किनारा नावाच्या या घराला त्यांनी त्यांच्या स्वप्नांनी सजवले आहे. शिल्पाच्या घरातून समुद्राचा दिसणारा जो देखावा आहे तो खूप मनमोहक आहे.

देवावर तिची खूप श्रद्धा असून ती रोज देवपूजा करते. ती घरात गणपतीही आणते. तिला एनिमल प्रिंटची आवड आहे आणि म्हणूनच तिने घर आणि द्रोविंग रूमची खास सजावट केली आहे.तिचे घर ती खूप मनापासून सजवते, इतकेच नाही तर त्यासाठी खरेदीही करते.

तिला सजावटीची खूप आवड असून ती सतत घराला डिझाईन करत राहाते, इतकेच नाही तर जगभरातून वस्तू जमा करते.

तिच्या घराची बैठक वेगळी दिसते, उत्कृष्ठ रंगसंगती वापरल्याने हा भाग खास दिसतो. घरातील पडदे आणि लायटिंग यांचे उत्तम कॉम्बिनेशन असून त्यामुळे प्रत्येक कोपरा हा उजळून निघाला आहे. घरात उत्तम प्लांट्स लावलेले असल्याने खूप सुंदर वाटते. तिच्या घरातील गार्डन उत्तम सजवलेले असून ती तिकडे योगा करते.

पती राज आणि मुलगा वियान यांच्याबरोबर ती एक सुंदर वैवाहिक आयुष्य जगत असून लवकरच ती निकम्मा या चित्रपटाद्वारे चित्रसृष्टीत पुनरागमन करणार आहे.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.