मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला जानेवारीमध्ये साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीच्या विषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्याच्या प्रवेशास “संक्रांती” म्हणतात. खरे तर मकर संक्रांतीमधील मकर हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे. व संक्रांती म्हणजे संत्र मन या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला ‘मकर संक्रांती’ म्हणतात.
मकर संक्रांती आली की सर्वांना प्रश्न पडतो की, यंदा मकर संक्रांती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जात आहे? कोणते वस्त्र घालून संक्रांती येत आहे? आणि कोणते पदार्थ सेवन करत आहे? म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की, संक्रांती गर्धबावर विराजमान होऊन, व गुलाबी वस्त्र धारण करून, मिठाईचे सेवन करत दक्षिण दिशेकडून पश्चिम दिशेकला जाणार आहे. या वर्षी संक्रांतीचे वाहन हे एक गर्धब असणार आहे आणि संक्रांती गुलाबी वस्त्र धारण करून येणार आहे. सूर्याच्या उत्तरायणा नंतर देवांच्या ब्राम्ह मुहूर्त उपासनेचा काल सुरू होतो. या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापणा गृहनिर्मिती, यज्ञकर्म, आदि पुण्यकर्म केली जतात, म्हणूनच मकर संक्रांतीच्या या पुण्यकाळात दान धर्मालाही खूप जास्त महत्व असते.
मकर संक्रांतीचा पूजा मुहूर्त, पुण्यकाळ मुहूर्त हा, “7 वाजून 15 मिनिटे” ते ” 12 वाजून 30 मिनिटे” इथपर्यंत राहील. म्हणजेच 5 तास 14 मिनिटे इतका असणार आहे. आणि महापुण्यकाळ हा “7 वाजून 15 मिनिटे” ते ” 9 वाजून 15 मिनिटे इतका राहणार आहे. व संक्रांती क्षण हा “1 तास 53 मिनिटे 48 सेकंद” इतका असणार आहे. मकर संक्रांतीचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो. यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा-अर्चना, विशेष गंगास्नान, दानधर्म केले जातात. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत, मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे या दिवशी जी माणसे दान देतात त्यांना सूर्य प्रत्येक जन्मात भरभरून देत असतो असा एक समज आहे.
मित्रांनो ही होती 15 जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती आणि पूजा मुहूर्त, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या परिवारातील लोकांना ही माहिती नक्की शेअर करा.