लोकांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत बॉलीवूडच्या या अभिनेत्री, स्वबळावर करत आहेत मुलांचे पालनपोषण

सिंगल पेरेंट होणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, जे लोक आपल्या मुलांना एकट्याने वाढवतात ते लोक खूप हिंमतवान असतात. एका स्त्रीसाठी तिच्या मुलाला एकटीने वाढवणे हे खूप कठीण काम असते. खासकरून महिलांसाठी हे एक आव्हान असते. इतकी सगळी आव्हाने पेलून आणि संघर्ष करत ती तिच्या मुलांना एक उत्तम आयुष्य देऊ करते. बॉलीवूडच्या अश्या कित्येक अभिनेत्री आहेत ज्या एक सिंगल पेरेंट असून त्यांनी ही जबाबदारी एकटीने उत्तमरीत्या निभावली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड अभिनेत्रींशी ओळख करून देणार आहोत ज्या सिंगल मदर आहेत आणि आपल्या मुलांना समर्थपणे एकट्याने वाढवून लोकांसमोर ज्यांनी आदर्श घालून दिला आहे.

सुष्मिता सेन

हिने दोन मुलींना दत्तक घेतले असून त्यांचे पालनपोषण एकटीने समर्थपणे करत आहे.

करिष्मा कपूर

पती संजय कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर करिष्माने तिच्या दोन्ही मुलांना एकटीने वाढवले आहे.

नीना गुप्ता

अविवाहित असून नीनाने तिचा पूर्वीचा प्रियकर आणि क्रिकेटर विवियन रिचर्डस यांची मुलगी मासाबा हिला जन्म दिला आणि एकटीने वाढवले.

कोंकणा सेन शर्मा

रणवीर शेरे याच्याशी वेगळे झाल्यानंतर कोंकणा सिंगल मदर बनून तिची जबाबदारी पार पाडत आहे,

अम्रिता सिंह

सैफ आली खान याच्याशी वेगळे झाल्यानंतर अमृताने सारा आणि इब्राहीम या दोन्ही मुलांना एकटीने मोठे केले.

पूजा बेदी

पूजा बेदी हीसुद्धा एक सिंगल मदर आहे. पती फरहान इब्राहीम याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर पूजाने आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी एकटीने पार पाडली तसेच मुलांना एक उत्तम आयुष्य दिले.

सारिका

कमल हसन याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर सारिकाने तिच्या दोन्ही मुली श्रुती आणि अक्षरा यांना एकटीने वाढवले.

पूनम धील्ल्लो

अशोक ठाकरियाशी घटस्फोट झाल्यानंतर पूनम सिंगल मदर झाली आणि ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.

नीलिमा अजीम

नीलिमा अजीम बॉलीवूड अभिनेता शहीद कपूर याची आई आहे.नीलिमा ही एक बॉलीवूड अभिनेत्रीसुद्धा होती.पंकज कपूरपासून वेगळे झाल्यानंतर तिने शहीदचे पालनपोषण एकटीने केले.

डिंपल कपाडिया

वयाच्या १६व्या वर्षी डिंपल हिने राजेश खन्नाशी लग्न केले. पण काही मतभेद झाल्याने ते वेगळे झाले आणि डिंपलने एकटीच्या बळावर ट्विंकल आणि रिंकी या दोन्ही मुलींना वाढवले.

Leave a Reply

Your email address will not be published.