बिना मेहनत काचेची सफाई, चुटकीसरशी काचा चमकदार करायच्या असतील तर हा उपाय करा…

आपल्या घरात काचेचा वापर तर होतोच. दरवाजे खिडक्या, शोकेस इथल्या काचा स्वच्छ करणे म्हणजे एक महत्वाचे काम असते. जर तुम्ही काही महत्वपूर्ण टिप्सचा वापार केलात तर नक्कीच तुमच्या घरातील काचा अगदी साफ रहातील तेही कमी वेळात.

विनेगर देई नवीन लुक

जर तुम्ही गाडीच्या काचा साफ करत अस्सल तर विनेगरचा वापर नक्की करा. याने काचा काही मिनिटांत साफ होतील. एक ब्रश घेऊन त्यावर विनेगार घाला आणि त्याने जर कोणत्याही काचा साफ केल्यात तर तुउमचे काम नित आणि कमी वेळात पूर्ण होईल. एका स्प्रेच्या बाटलीत विनेगरचे पाणी भरून त्याने काच स्वच्छ करणे अगदी सोपे होईल.

बेकिंग सोडा

जर तुम्हाला काचा साफ ठेवायच्या असतील तर बेकिंग सोडा वापरा. आपपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असल्याने तुम्हाला पटकन हा उपाय करून बघता येईल. मऊ कापड घेऊन याने हा सोडा काचावर लावायचा ज्याने काच लगेच साफ होईल. हे करून झाल्यानंतर पाण्याने साफ करा. याने काही मिनिटात काच स्वच्छ आणि चमकदार होईल.

शेविंग क्रीम करेल कमाल

तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेले शेविंग क्रीम खूप गुणकारी आहे. होय, काचेवरील धूळ हे क्रीम फक्त काही मिनिटात साफ करेल आणि काच नव्यासारखी चमकू लागेल. तुमच्या बाथरूमची किंवा गाडीची काच या क्रीमने साफ करून पहा. साफ केल्यानंतर मऊ कपड्याने पुसा आणि फरक पहा.

लिंबाचा रस दाखवी किमया

जर काचेवर जुने डाग पडले असतील तर लिंबाचा रस वापरून पहा. लिंबाचा रस या जुन्या डागांना काढून टाकून नव्यासारखी चमक देईल. लावताना लिंबाच्या रसात थोडे पाणी मिसळून त्यांनतर मऊ फडक्याने पुसून घ्या.

कागदाचा वापर करा

कागद काचेला अगदी कमी वेळात साफ करतो. काचेला कागदाने पुसून घेतल्यास ती साफ होईल मग ओले करायचीही गरज नाही. याने काच नव्यासारखी चमकू लागेल.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.