या कारणामुळे दीपिका पादुकोणने अजूनही सलमान बरोबर एकाही चित्रपटात काम केलेले नाही…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची ‘छपाक’ हा चित्रपट ह्या महिन्यात 10 जानेवारीला रिलीज झाला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहेत. दीपिका पादुकोण ही अनेक रियालिटी शो मध्ये ‘छपाक’चे प्रमोशन केले आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला विचारण्यात आले की, ती सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शो मध्ये’ छपाक ‘च्या प्रमोशनसाठी जाईल का.? यावर दीपिका पादुकोण म्हणाली, “नाही…!, ‘बिग बॉस’ वर जाण्याबाबत कोणताच संवाद झालेला नाही. ”बिग बॉस” शिवाय दीपिका पादुकोणने सलमान खानबरोबर काम करण्याबाबतही एक विधान केले होते, ज्याने बऱ्याच लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.

दीपिका पादुकोण सलमान खान सोबत काम करण्याबद्दल म्हणाली की, “याबद्दल आमच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते की, आम्ही एकत्र एक चित्रपट करत आहोत, किंवा आम्ही कधी एकत्रित चित्रपट करणार आहोत. मला देखील खरोखर ते करायचे आहे, परंतु योग्य प्रकारच्या चित्रपटासाठी एकत्र येणे आपल्यासाठी अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते. आपण सलमानला नेहमीच काही विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांत पाहिले आहे.”

सलमान खानविषयी अभिनेत्री दीपिका पादुकोण पुढे म्हणाली की, “मी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाची सर्वात मोठी फॅन आहे, आणि मला त्यांना अशा भूमिकेत पहायचे आहे, किंवा त्यांनी जे काम केले आहे त्यापेक्षा काही वेगळे बघायला मला खूपच आवडेल. म्हणून मला असे वाटते की खरोखर स्क्रिप्ट आहे (जी महत्वाची आहे). अलिकडच्या काळात आम्हाला एकत्र काम करण्याचा प्रस्ताव आलेला नाही, परंतु त्यांच्याबरोबर एखादा चित्रपट करायला मला नक्की आवडेल.

मित्रांनो तुम्हाला काय वाटते दीपिका आणि सलमान खान यांनी एकत्रित चित्रपट केले पाहिजे का? आम्हाला तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *