फक्त रवी किशन नव्हे तर या अभिनेत्यांनीसुद्धा केल्या आहेत किन्नराच्या भूमिका, यांना पाहून सगळेच घाबरले…

बॉलीवूडमध्ये काही भूमिका अशा आहेत ज्या त्यांच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अशा भूमिका खूप प्रसिद्धही झाल्या आहेत. भूमिका सगळ्यांनाच मिळतात पण काही अभिनेते किंवा अभिनेत्री त्यात जिवंतपणा आणून त्याला न्याय देतात. किन्नर ही एक अशी भूमिका आहे जी फार कठीण आहे आणि त्यात शिरणे हे त्याहून अवघड आहे. रवी किशन अशा प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. फक्त रवी किरणच नाही तर असे आणि इतर अभिनेते आहे ज्यांनी ही भूमिका आत्तापर्यंत चोख निभावली आहे. आज जाणून घेऊ त्यांच्याबाबत

महेश मांजरेकर

२०१३ साली रज्जो चित्रपटात महेश मांजरेकरन यांनी किन्नराची भूमिका निभावली. यांत कंगना राणावत हिने तिच्यापेक्षा वयाने खूप लहान मुलाशी रोमान्सचा अभिनय केला होता. थाश नावाच्या चित्रपटात महेश मांजरेकरने किन्नराची भूमिका केली. पिक्चर जरी फ्लॉप झाला असला तरी लोकांनी महेशच्या अभिनयाला पसंती दिली.

सदाशिव अमरापूरकर

महेश भट चा चित्रपट सडक यांत सदाशिव अमरापूर याने उत्तम अभिनय केला होता. या चित्रपटात संजय दत्त आणि पूजा भट यांनी मुख्य भूमिका निभावल्या. सदाशिव अमरापूरकर यांच्या किन्नराच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळविले.

आशुतोष राणा

शबनम मौसी ही अशी पहिली किन्नर होती जिने निवडणूकही लढविली आणि ती जिंकली सुद्धा. या शबनम मौसीच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनला ज्यात आशुतोष राणा यांनी शबनम मौसीची मुख्य भूमिका रंगविली. हा चित्रपट २००५ साली आला आणि त्याआधी राणा यांनी संघर्ष नावाच्या चित्रपटात किन्नरांची भूमिका केली होती जी खूप गाजली होती.

परेश रावल

१९९७ साली तमन्ना चित्रपटात परेश रावल याने किन्नराची भूमिका केली होती. हा चित्रपट महेश भट याचा होता आणि त्यात पूजा भट मनोज वाजपेयी यांनी भूमिका निभावल्या.

प्रशांत नारायणन

 

मर्डर चित्रपटात प्रशांतने एका सायको किन्नराची भूमिका निभावली होती ज्याला मुलींच्या किंचाळ्यांनी समाधान मिळत असे. चित्रपट हिट झालाच पण प्रशांतच्या दिमाखदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकून घेतली.

रवी किशन

निर्देशक तीग्मंषु धुलिया याच्या बुलेट राजा चित्रपटात रवीने किन्नराची भूमिका निभावली होती. रवी याने अनेक भोजपुरी चित्रपटात काम केले आहे म्हणून ते या भूमिकेला योग्य न्याय मिळवून देऊ शकले.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.