भारतात सगळ्यात महाग गाड्या चालवणारे आहेत सात श्रीमंत सेलिब्रिटी, एक नंबरवर मुकेश अंबानी नाही !

ज्यांच्याकडे खूप पैसे असतात ते त्यांचा रुबाब तर दाखवतातच. काही लोकांना उच्च राहणीमानाची आवड असते आणि यांमुळे लोक त्यांच्यावर प्रभावित होतात. काहींना महाग कपडे घालायला आवडतात तर काही लोक उंची खाणे पसंत करतात, आज आपण अशा काही सेलिब्रिटीबद्दल बोलणार आहोत ज्यांना उंची गाड्या मिरविण्याचा शौक आहे. त्यांच्याकडे करोडोंचे बंगले आहेत आणि कोण जाणे किती करोडोंच्या गाड्या आहेत. भारतातील सगळ्यात महाग गाड्या चालविणारे सात मोठे लोक, आणि हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. फक्त बॉलीवूड नाही तर क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातून हे श्रीमंत सेलिब्रिटी आलेले आहेत.

शाहरुख खान

बॉलीवूडचे किंग खान शाहरुख खान हे जगातल्या सगळ्यात श्रीमंत १०० लोकांपैकी एक असून श्रीमंत अभिनेत्यांमध्ये यांचे नाव सगळ्यात वर आहे, हे उच्च राहणीमान जगतात. तसे तर त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत पण भारतातील सगळ्यात महागडी गाडी बुगाटी वेरॉन त्यांच्याकडे आहे. याची किंमत भारतात १२ करोड इतकी आहे.

अमीर खान

 

नावाप्रमाणेच अमीर असलेल्या आमीर खानचे नाव श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरे आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अमीर खान याचा वर्षातून एक चित्रपट रिलीज होतोच. त्यांच्याकडे मर्सिडीज बेनझ ६०० असून त्याची भारतात किंमत १० करोड इतकी आहे.

मुकेश अंबानी

भारतातील सगळ्यात श्रीमंत बिझिनेसमन मुकेश अंबानी याचे घर हे भारतातील सगळ्यात अलिशान घर असून त्याच्याकडे एकूण ६२ गाड्या आहेत. यादीत त्यांनी तिसरा नंबर पटकावला असून त्यांच्याकडच्या या गाड्यांची किंमत ५.४ करोड इतकी आहे.

राम चरण

बॉलीवुड चा हा दाक्षिणात्य कलाकार त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेतो. यांचेही नाव यादीत उच्च असून यांच्याकडे रेंजर रोवर कार आहे ज्याची भारतीय किंमत ३.१ करोड रुपये आहे.

अमिताभ बच्चन

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या ७८ व्या वर्षीही तितकेच सक्रीय असून त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत. यातले दोन चित्रपट येत्या वर्षात रिलीज होणार असून त्यांचेही नाव या यादीत समाविष्ट आहे, अनेक उंची गाड्या बाळगण्याचा शौक असलेल्या अमिताभ यांच्याकडे रोल्स रॉयस फांटम असून त्याची किंमत तीन करोड इतकी आहे.

विराट कोहली

भारतीय टीमचे कप्तान विराट कोहलीही काही या बाबतीत मागे नाहीत. या यादीत त्यांचेही नाव सामील आहे. फक्त खेळाडू नाही तर ते एक मॉडेलही असून उच्च राहणीमान ते पसंत करतात. त्यांच्याकडे ऑडी आर एट असून त्याची किंमत भारतात २.६४ करोड रुपये इतकी आहे.

सचिन तेंडूलकर

टीम इंडियाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांना क्रिकेट जगतातील देव मानले जाते. त्यांची उच्च राहणी असून त्यांच्याकडे BMW १८ ही गाडी असून त्याची किंमत २.२ मिलियन इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.