लग्नानंतर दीड वर्षांनी अनुष्काने उलगडले गुपित- म्हणाली, ‘कमी वयातच लग्न झालं, कारण कोहलीला…

अनुष्का शर्मा ही बॉलीवूडच्या सगळ्यात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक असून लग्नानंतर दीड वर्षांनी तिने एक सिक्रेट उलगडले आहे, ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. २०१७ साली तिने क्रिकेटपटू विराट कोहली याच्याशी विवाह केला, त्यानंतर त्यांच्यावर खूप चर्चा झाली. अनेक प्रश्न उभे राहिले. तिने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा ती करियरच्या महत्वाच्या टप्प्यात होती. आणि या गोष्टीचा तिने अखेरीस खुलासा केला आहे. मीडियाशी बोलताना अनुष्काने अनेक गोष्टीचा खुलासा केला. एक अभिनेत्री असूनही तिने कमी वयात लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि त्यावर उठलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरेही तिने दिली आहेत. वयाच्या २९ व्या वर्षी ती विवाहबद्ध झाली आणि त्यांनतर अनेक अफवाही उठल्या.

लहान वयात लग्न केल्याने तिच्या करीयरवर परीणाम होईल असे अनेकांना वाटले पण तसे नसते, प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकाराला पडद्यावर पाहायचे असते आणि अशा वेळी वय आड येत नाही. कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाशी त्यांचा काही संबंध नसतो. तिचे असे म्हणणे आहे की लग्नाने करीयरवर काही परीणाम होत नाही उलट जबाबदारीची जाणीवच होते.

नात्याला नवीन वळणावर न्यायचे होते- अनुष्का

त्या दोघांच्या नात्याला तिला नवीन वळणावर न्यायचे होते आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला. विराट वर तिचे मनापासून प्रेम होते आणि त्या प्रेमाला तिला एका गोड बंधनात बांधायचे होते. तिने हेही सांगितले की ती फार नशीबवान आहे म्हणून तिला इतका प्रेमळ आणि प्रामाणिक जीवनसाथी मिळाला. यांत काही खोटे नाही, सगळे सत्य असून ती या निर्णयाने खूप आनंदी आणि समाधानी आहे.

लग्नानंतर काम करताना भय वाटत नाही- अनुष्का

लग्नानंतर काम करताना कोणतीही भीती वाटली नाही उलट समाधान वाटले असे अनुष्काने सांगितले. लग्नानंतर काम करताना पुरुष घाबरत नाहीत तर स्त्रियांनी का घाबरावे ? अनुष्का शर्माने विराट कोह्लीशी इटली येथे ११ डिसेंबर २०१७ मध्ये विवाह केला आणि आज याला दीड वर्ष उलटून गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.