खूपच महागडे शौक आहेत अजय देवगणचे, यांच्याकडील चार सगळ्यात महाग वस्तूंनी वसू शकतो एक संपूर्ण गाव…

अजय देवगणचे नाव घेतल्यावर डोळ्यासमोर येते ते एक शांत, धीरगंभीर व्यक्तिमत्व. त्याला या चित्रसृष्टीमध्ये आता २६ वर्षे झाली आहेत. एक कलाकार म्हणून तो उत्तम आहेच पण एक बालकलाकार म्हणूनही तो उत्तम होता. होय, त्याने त्याच्या करीयरची सुरुवात एक बालकलाकार म्हणूनच केली होती. आज त्यांच्या खात्यात एकापेक्षा एक हिट चित्रपट आहेत. गेल्या काही वर्षांत त्याने इतके नाव कमावले आहे की त्याचे चाहते जगभरात आहेत. हल्लीच त्याचा चित्रपट दे दे प्यार दे रिलीज झाला असून त्याने बॉक्स ऑफिसवर उत्तम अईल कलेक्शन केले आहे. या चित्रपटात तब्बू आणि रकुल प्रीत यांनी भूमिका केल्या आहेत.

त्याने त्याच्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत आणि स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्याची कमाई करोडोंच्या घरात असून त्याला महागड्या वस्तू बाळगायचा शौक आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्याकडील अश्या वस्तूंबाबत सांगणार आहोत ज्याच्या किमती ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.

फार्म हाउस

अजयकडे एक शानदार फार्म हाउस असून ते कर्जतजवळ आहे. २८ एकर एवढ्या परीसरात पसरलेल्या ह्या फार्म हाउसची किंमत २५ करोड इतकी असून यात भाज्या आणि फळे पिकतात.

लंडन हाउस

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण याने लंडनमध्येही एक घर खरेदी केले आहे. हे घरखूप महागडे असून मिडीयाच्या माहितीनुसार याची किंमत ५४ करोड इतकी आहे.

प्रायवेट जेट

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अजयकडे एक प्रायवेट जेटही असून हॉकर ८०० नावाच्या या प्रायवेट जेटची किंमत अंदाजे ८४ करोड इतकी आहे. त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंपैकी हे जेट सगळ्यात महागडे आहे.

रेंज रोवर कार

रेंज रोवर कंपनीच्या सगळ्यात महागड्या कारपैकी एक त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे रेंजर रोवर वोग कार आहे ज्याची किंमत २.०८ करोड इतकी आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडी कारही आहेत.

या हिट चित्रपटात केले आहे काम

९० च्या दशकात अजय देवगणने चित्रपटात काम सुरु केले. एक्शन चित्रपट जास्त केले असल्याने एक्शन हीरो म्हणून त्याचे नाव झाले. पण जेव्हा त्याने कॉमेडी चित्रपटातही तितक्याच ताकतीच्या भूमिका निभावल्या तेव्हा तेव्हा तो सर्वगुणसंपन्न आहे हे सिद्ध झाले. आतापर्यंत बॉलीवूडला त्याने उत्तमोत्तम चित्रपट दिले असून त्यात दृश्यम, सिंघम, गोलमाल या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.