मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की, प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावाने होते. परंतु काहीवेळा लोकांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःचे नाव बदलावे लागते. आणि जर याचे उत्तम उदाहरण पाहायचे झाले तर ते आपल्या चित्रपटसृष्टीतच पाहायला मिळते. हो अगदी बरोबर ऐकले तुम्ही चित्रपटसृष्टीत असे अनेक तारे आहेत, ज्यांचे नाव यापूर्वी काहीतरी वेगळे होते, परंतु चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलले आणि आज ते आपल्या नवीन नावाने जगभर प्रसिद्ध आहेत. या अभिनेत्रींची जुनी नावे फारच कमी लोकांना माहित असतील. तर आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही स्टार्सशी ओळख करुन देणार आहोत ज्यांनी चित्रपटात येण्यासाठी त्यांची नावे बदलली आहेत आणि आज जग त्यांना त्यांच्या बदललेल्या नावांनीच ओळखते.
प्रीती जिंटा
‘प्रीती जिंटा’ ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रिती जिंटाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1998 साली फिल्म ‘दिल से’ या चित्रपटापासून केली होती… चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी तिचे नाव प्रीतम सिंह झिंटा” असे होते. 2016 मध्ये प्रितीने अमेरिकन बिझनेसमन ‘जेन गुडइनफ’ यांच्याशी लग्न केले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रीती आयपीएल मधील “किंग्ज 11 पंजाब” या संघाची मालकीण आहे.
श्रीदेवी
श्रीदेवी ह्या बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार होत्या. त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री तर होत्याच, पण त्याच बरोबर त्या एक उत्तम डान्सर देखील होत्या. श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनयासाठी बक्षीसे जिंकली होती, परंतु त्या चित्रपटसृष्टीत् येण्यापूर्वी त्यांचे नाव ‘अम्मा येनगार अय्यपान’ असे होते. पण चित्रपटात येण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलून श्रीदेवी असे केले.
तब्बू
तब्बू बॉलिवूड ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आतापर्यंत तब्बूने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि सर्वांना तिच्यातील अभिनयाच्या कौशल्या विषयी माहिती आहे. ती बॉलिवूडच्या सर्वात शक्तिशाली अभिनेत्रींमध्ये मोजली जाते. तब्बूने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1985 मध्ये ‘हम नौजवान’ या चित्रपटाद्वारे केली होती. तुम्हाला सांगू इच्छितो की, तब्बूचे खरे नाव “तबस्सुम हसीम खान” असे आहे. बॉलिवूडमध्ये येताच तिने आपले नाव बदलून ‘तब्बू’ असे ठेवले.
शिल्पा शेट्टी
आपल्या ठुमक्यांनी यूपी बिहार लुटणारी ‘शिल्पा शेट्टी’ बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 90 च्या दशकात शिल्पाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. तुम्हाला सांगू इच्छितो की, शिल्पा शेट्टीचे प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यंच्याशी लग्न झाले आहे. फारच कमी लोकांना हे समजेल असेल की, शिल्पा शेट्टीचे खरे नाव “अश्विनी शेट्टी” आहे. चित्रपटात दिसण्यापूर्वी तिने तिचे नाव बदलून शिल्पा शेट्टी असे ठेवले होते.
सन्नी लियोन
सर्वात प्रथम लोकांनी सनी सन्नी लियोनला बिग बॉसमध्ये पाहिले. या शोने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. बिग बॉस नंतर सनीला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. सनीने आपल्या फिल्म करिअरची सुरुवात 2012 मध्ये ‘जिस्म’ या चित्रपटातून केली होती. आज सनी बॉलीवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. आणि तिचे खरे नाव “करणजीत कौर वोहरा” असे आहे.
कैटरीना कैफ़
‘कैटरीना कैफ़’ चे नाव जगातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे. सलमान खानने कैटरीनाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला होता. सध्या ती बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आज बॉलिवूडमधील प्रत्येक नायक आणि दिग्दर्शक त्यांच्याबरोबर काम करू इच्छित आहेत. आणि फार कमी लोकांना माहित असेल की, कैटरीना कैफ़चे खरे नाव “कैटरीना टर्कोटे” हे आहे.
मित्रांनो तुम्हाला ह्या अभिनेत्रींनपैकी कोणत्या अभिनेत्रीचे नाव सर्वात जास्त आवडले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.