तिच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मिस इंडिया १९८१ ची विजेती मीनाक्षी शेषाद्री ही बरीच गाजलेली अभिनेत्री. १९८३ सालात पेंटर बाबू चित्रपटात डेब्यू केल्यानंतर तिला १९८३ चा चित्रपट “हीरो” मध्ये नवीन ओळख मिळाली. दामिनी मधली तिची भूमिका हि तिच्या करियरला एक नवीन ओळख देणारी भूमिका होती असे म्हटले जाते. तिने अनेक चित्रपटात भूमिका केल्या आणि तिच्या उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. हल्ली ती जरी चित्रपट जगतापासून दूर असली तरी आम्हाला अशा काही गोष्टी माहिती आहेत ज्या त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत.
मीनाक्षी हीचे खरे नाव शशिकला शेषाद्री असून १९६३ मध्ये बिहारच्या तामिळ अयंगार ब्राह्मण परीवारात तिचा जन्म झाला. तिचे वडील खताच्या कारखान्यात काम करत असत. त्यांनी चार प्रकारच्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात प्राविण्य मिळविले, भरतनाट्यम, कुचीपुड़ी, कथक आणि ओडिसी. १९८१ सालात मीनाक्षी ने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि इतकेच नाही तर १७ वर्षे वयात तिने तो पुरस्कार प्राप्त केला.
९० च्या दशकातील प्रमुख अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचे नाव मोठमोठे स्टार कुमार सानू, डायरेक्टर राजकुमार संतोषी यांच्याशी जोडले गेले. पण त्यांनी १९९५ मध्ये अमेरिकेचे एक इनवेस्टमेंट बैंकर हरीश मैसूर यांच्याशी लग्न करून सगळ्यांची बोलती बंद केली. लग्नानंतर ती अमेरिकेच्या टेक्सास शहरात राहू लागली.
लग्नानंतर मीनाक्षीचे पती हरीश यांची पोस्टिंग वॉशिंग्टन येथे झाली. त्यांनतर ती तिथेच राहिली.
डेल्लास येथे तिचे एक ‘चेरिस डान्स स्कूल’ आहे. त्या तिथे डान्स शिकवतात. त्यांना दोन मुले आहेत, मुलगा जोश आणि मुलगी केंद्रा. एका मुलाखतीत जेव्हा तिला भारतात परत येण्याविषयी विचारले तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले की मुले मोठी झाल्यावर ती याचा विचार जरूर करेल.