पावटा खाण्याचे आरोग्यदायी फायदे – MAHITI Marathi

भारतात हिरव्या गरांचा पावटा हा भरपूर प्रमाणात आढळतो. पावटाल्या वाल, वरणा या नावाने देखील ओळखतात.  पावटा हा अत्यंत पाचक असतो, पावट्यात भरपूर पोषणतत्वे असून त्यात कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, लोह, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात.  पावटा भूक न लागणे, अपचन, आम्लपित्त या विकारावर गुणकारी असतो. पावट्याच्या आरोग्यदायी फायदे बऱ्याच जणांना माहिती नसतात म्हणूनच जाणून घेऊया या गुणकारी पावट्याबद्दल…

पावट्याचा रस महिलांसाठी खूपच गुणकारी आहे. ज्या महिलांना मासिक पाळीच्यावेळी त्रास होतो किंवा वेदना होतात त्यांनी पावट्याचा रस प्यायल्यास नक्कीच आराम पडतो. जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल,  तर तो कमी करण्यासाठी पावटयाची भाजी नियमितपणे  खावी त्यामुळे त्रास लवकर कमी होतो. पावट्यामध्ये पाचक गुणधर्म असतात, त्यामुळे जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास वारंवार जाणवत असल्यास, पावट्याच्या शेंगाचा काढा करून तो प्यायल्यास पोटात होणारी जळजळ कमी होते.

जर तुमच्या शरीरावर जखम झाली असल्यास पावट्याची भाजी दररोज खावी, यामुळे जखम भरून निघते. तसेच कॅल्शिअमची, ब आणि क जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी देखील पावटा गुणकारी आहे. मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा…आणि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की कळवा…आणि तुमच्या इथे पावट्याला काय म्हणतात ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *