चित्रपट उद्योगात कोणीही स्टार बनू शकते आणि अभिनेत्यांना या क्षेत्रात आयुष्याला पुरेल इतके पैसे जमवून ठेवता येतात. अनेक बॉलीवूड अभिनेते चित्रपट तसेच जाहिराती करून लाखो रुपये कमावतात आणि एक आरामदायी आयुष्य जगतात. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रीच्या भावाबाबत सांगणार आहोत, जे लाखो रुपये कमावण्याच्या बाबतीत त्यांच्याहून काही कमी नाहीत. ते वेगवेगळे व्यवसाय चालवतात आणि आपल्या अभिनेत्री बहिणींपेक्षा जास्त कमावतात, जास्त श्रीमंत आहेत.
ऐश्वर्या राय :- बॉलीवुडची सगळ्यात सुंदर अभिनेत्री आणि पूर्वीची मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय हिच्या भावाचे नाव आदित्य राय असून तो मर्चंट नेवीमध्ये इंजिनियर आहे. हे दोघे भाऊ बहीण नेहमी सुख दुःखात एकमेकांच्या बरोबर उभे असतात. आदित्यने एक चित्रपट ‘दिल का रिश्ता’ सुद्धा बनविला ज्यात त्याच्या बहिणीने म्हणजेच ऐश्वर्यानेही काम केले होते.
परिणीति चोपड़ा :- हिचे दोन भाऊ आहेत, शिवांग चोपडा आणि सहज चोपडा. सहज लंडन आणि दिल्ली मध्ये मिलीज कुकीज नावाने त्याचा कुकीजचा व्यवसाय सांभाळतो, ज्यातून तो करोडो रुपये कमवतो.
अनुष्का शर्मा :- हिचा एक भाऊ आहे कार्णेश. तो ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ चा मालक असून हे या भावंडांनी सुरु केलेले एक प्रोडक्शन हाउस आहे. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली जसे की, एनएच 10, फिल्लौरी, परी.
प्रियंका चोपड़ा :- हिच्या लहान भावाचे नाव सिद्धार्थ चोपडा असून तो स्वित्झर्लंड येथे पब तसेच लाउंज मुगशॉट चालवतो.
तर, मित्रांनो बॉलीवूड अभिनेत्रींच्या या भावांबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा….