रवी जाधव यांची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी, मित्राची बहीण झाली पत्नी….

मराठी चित्रपटसृष्टीत रवी जाधव हे एक प्रसिद्ध नाव आहे. तो एक उत्तम निर्माता, दिग्दर्शक यांच्या बरोबरीने उत्तम अभिनयही करतो. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्यांच्या लग्नाची एक रंजक कहाणी आहे. त्यांनी सोशल मिडीयावरही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट टाकली असून, त्यांनी काही छानसे फोटोही शेयर केले आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की, लग्नाचा वाढदिवस म्हणजे केवळ सोहळा नाही. तर ते तुझ्यासारख्या उत्तम व्यक्तीशी लग्न केल्याचा सोहळा करणे आहे.

त्यांनी स्वतःच्या मित्राच्या बहिणीशी लग्न केले. मेघना हि त्याच्या मित्राची बहिण. मित्राला भेटायला ते त्याच्याकडे जात तेव्हा मेघनाशी त्यांची भेट होई. असे करताना त्यांनी एकदा १४ फेब्रुवारीला तिला प्रपोज केले आणि तिने होकारही दिला. महिन्याभरात होकार कळवल्या नंतर त्यांचे प्रेम प्रकरण सुरु झाले.  त्यांच्या प्रेमाची माहिती त्याच्या वडीलांना समजली. तेव्हा त्यांनी सहज परवानगी दिली नाही. मेघनाशी लग्न करण्यासाठी त्याने स्वतःचे घर घ्यावे अशी अट त्यांनी घातली. ही अट रवी यांना मान्य होती, त्यांनी पैसे वाचवून आधी स्वतःचे घर उभारले आणि मग त्यांचे लग्न पार पडले.

मेघना यांनी शिक्षिकचे काम केले आहे. सुरुवातीला त्यांना ८०० रुपये पगार होता. रवीला नोकरी करायची नव्हती, त्याने नोकरी सोडल्यावर मेघनाने घरची आघाडी सांभाळली. आणि ती रवीच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्यांची दोन मुले आहेत.

काही वर्षांनी गावी जाऊन आरामात जीवन जगण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तर, मित्रांनो रवी जाधव यांच्या प्रेमकथेबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *