कीर्तनातून करोडो रुपये कमवून देखील, साधेपणाने जगतात आयुष्य….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आपल्या महाराष्ट्राला वारकरी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत, संतांनी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी जीवनाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला आहे. या संतांनी लोकांना याचे विस्मरण होऊ नये, म्हणून ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांचाच वारकरी संप्रदायी अभ्यास करून वारकरी परंपरा पुढे चालू ठेवत आहेत, त्यापैकी एक म्हणजे इंदूरीकर महाराज…….!! तर आज आपण इंदूरीकर महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

इंदुरीकर महाराजांचे पूर्ण नाव “निवृत्ती महाराज देशमुख” असे आहे. महाराजांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात, अकोला तालुक्यातील, ‘इंदुरी’ गावात झाला, इंदुरी गावात जन्म झाल्याने लोक त्यांना इंदुरीकर या नावाने ओळखू लागले. इंदुरीकर महाराजांचा विवाह साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी झाला असून, त्यांच्या पत्नीचे नाव ‘शालिनीताई देशमुख’ असे आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्य आहेत. महाराजांच्या पत्नी म्हणजेच शालिनीताई देशमुख या देखील किर्तनकार आहेत. शालिनीताई देक्षमुख यांना इंदुरीकर महाराजांच्या इतकी प्रसिद्धी नसली, तरी त्या गावोगावी जाऊन वारकरी परंपरेचा वसा चालवतात. इंदुरीकर महाराज कीर्तन जरी गावरान भाषेत करत असले तरी ते शिक्षित आहेत, त्यांचे “BSc, B.Ed” शिक्षण झालेले आहे.

साधारण वयाच्या 22 किंवा 23 वर्षी महाराजांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली, कीर्तनाची परंपरा अशी होती की, कीर्तनाला फक्त देवांचेच दाखले देऊन कीर्तनाला घेतलेले अभंग सोडवले जायचे. पण इंदुरीकर महाराजांनी आपले कीर्तन हे वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडले. संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज ह्या संत लोकांचे संदर्भ देत ते सांगायचे. इंदुरीकर महाराजांनी या संतांचा वारसा चालवलेला आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण इंदुरीकर महाराजही समाजातील काही नको असलेल्या रुडी परंपरा यावर भाष्य करत असतात. आपल्या अस्सल गावरान भाषेत आणि विनोदाच्या शैलीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे, इंदुरीकर महाराजांचे असे मत आहे की आजच्या समाजाला देव देवतांचे दाखले देण्यात काहीही अर्थ नाही…..!!

इंदुरीकर महाराजांनी समाजाला त्यांच्या चुका विनोदाच्या शैलीत आपल्या कीर्तनातून सांगत असतात, “देवाची भक्ती आपण फक्त पूजा-अर्चना करून नाही तर आई वडिलांची सेवा करून देवाची भक्ती करू शकतो, असे ते नेहमी सांगतात.” समाजातील काही मार्मिक दाखले देखील देत, जाती-पाती न मानता सर्वांनी एकमताने नांदावे असा संदेश इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. तरुणांच्या व्यसनमुक्तीवर देखील महाराज बोचऱ्या विनोदात तरुणांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगतात, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन करण्याच्या या शैलीमुळे त्यांना सुरवातीला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. संप्रदायातील काही लोकांनीही त्यांचा विरोध केला होता. तरी देखील महाराजांनी आपल्या कीर्तनाची शैली सोडली नाही, आजही ते त्याच शैलीत कीर्तन करत असतात आणि लोक देखील त्यांना प्रचंड साथ देतात.

लोकांच्या आजच्या वागण्यामुळे किंवा सवयीमुळे हा समाज कोणत्या दिशेने जातोय याचे अचूक वर्णन महाराज कीर्तनातून करत असता.त त्यांच्या या प्रभोदनामुळे काही लोकांच्यात फरक पडेल याचा त्यांना विश्वास आहे आणि ते सांगतात की जरी सर्वाना त्यांचे कीर्तन नाही पटले, तरी काही जणांना ती काळाची गरज आहे. इंदुरीकर महाराजांचे नाव हे प्रत्येक घरात आदरणारे घेतले जाते. त्यांच्या 2 वर्षांपर्यंत कीर्तनाच्या तारखा बुक झालेल्या आहेत, 2021 पर्यंत त्यांच्याकडे एकही तारीख उपलब्ध नाही, यावरूनच आपल्या लक्षात येते की इंदुरीकर महाराज किती लोकप्रिय आहेत. इंदुरीकर महाराज एका कीर्तनाचे 50 हजार ते 1 लाख रुपये येवढे घेतात, एकूण दिवसातून तीन कीर्तन तर करतात त्याप्रमाणे दिवसाची कमाई साधारण दीड ते तीन लाख रुपये येवढी असते, महिना अखेरीस ते 50 ते 90 लाख एवढी कमाई करतात.

एवढी कमाई असून देखील इंदुरीकर महाराज एकदम साधे आणि सरळ जीवन जगणे पसंत करतात. इंदुरीकर महाराजांनी अनाथ आणि गोरगरिब मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या आहेत, कीर्तनात महाराज नेहमी सांगतात की नेहमी दान-धर्म केला पाहिजे. त्यामुळे स्वतः त्यापासून अलिप्त न राहता यांनी शाळा सुरू केली आहे, त्यांनी ही शाळा अहमदनगर मधील संगमनेर तालुक्यातील ओझर या गावात चालू केली आहे. त्या शाळेत अनाथ मुलांचा मोफत शिक्षण हे त्यांच्या स्वकमाई मधून देत असतात, त्यांनी मुलांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. ते ‘8’वी आणि ‘9’वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन देखील करतात. त्यांनी शाळे सोबत गाईंचे संवर्धन म्हणून गोशाळा देखील सुरू केलेली आहे,

तर, मित्रांनो इंदुरीकर महाराजांच्या विषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published.