बॉलीवूड फिल्म जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, ज्यांचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होत असतात. सध्याच्या काळात बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या सौंदर्याने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आज आम्ही तुम्हाला मागच्या जमान्यातल्या काही अशा अभिनेत्रींचे फोटो दाखविणार आहोत, ज्या वयाच्या सोळाव्या वर्षीही खूप सुंदर दिसत असत.
श्रीदेवी
२०१८ साली श्रीदेवी ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. पण या फोटोत आपण पाहू शकता की ती तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी किती सुंदर दिसत असे. तिच्या सौंदर्यामुळेच ती बॉलीवूडमध्ये नाव आणि यश मिळवू शकली.
रेखा
१९८० चा काल हिने गाजवला, त्या काळातील सगळ्यात आवडत्या अभिनेत्रींपैकी ही एक होती. हा फोटो तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षी घेतला आहे. यांत तुम्ही पाहू शकता की त्या काळात हि ती किती सुंदर दिसत होती, नावाप्रमाणेच रेखीव होती.
तब्बू
या फोटोत तुम्ही तब्बूचे सौदर्य पाहून शकता. तिचा हा फोटो तिच्या शाळेतल्या दिवसांत घेतला गेला आहे. या फोटोवरून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकता.
दिव्या भारती
१९९० च्या दशकांत गाजलेल्या अनेक उत्तम अभिनेत्रींपैकी ही एक असून तिचा मृत्यू दुर्दैवाने फार लवकरच्या काळात झाला. तिचा हा फोटो त्या काळातला आहे, जेव्हा तिने सिनेसृष्टीमध्ये पाउलही ठेवले नव्हते. तेव्हा ती फक्त सोळा वर्षांची होती.
माधुरी दीक्षित
१९९० च्या दशकात लाखो लोकांची धडकन असलेली हि अभिनेत्री, जिने एक दोन तीन च्या तालावर सगळ्यांना नाचवले. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा ती १६ वर्षांची होती.