….म्हणूनच बुधवारच्या दिवशी मुलीला सासरी पाठवत नाहीत !

आपल्या देशात सगळ्या जातीधर्मांचे लोक राहतात आणि प्रत्येक धर्माची स्वतंत्र अशी परंपरा असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परंपरेबाबत सांगणार आहोत जी सगळेच पाळतात, पण त्यामागचे कारण फार थोड्या लोकांना माहिती आहे. त्या परंपरेचे नाव आहे, पाठवणी. वास्तविक मुलीची पाठवणी लग्नानंतर होते, पण जेव्हा जेव्हा ती माहेरी येते, आणि परत सासरी जाते, तेव्हाही तिची पाठवणी केली जाते. पण हि पाठवणी तिच्या माहेरचे लोक कधीही बुधवारी करत नाहीत. शास्त्रात याची अनेक महत्वाची कारणे सांगितली आहेत.

शास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला गेला आहे. जर बुधवारी मुलीला सासरी पाठवले गेले तर अनेक अपशकून होऊ शकतात जसे की
१. संकटे येतात

असे केल्याने अनेक संकटांचा सामना करायला लागू शकतो. यांमुळे तुमचे जीवन दुःखी होऊ शकते. जर मुलीच्या पत्रिकेत बुध ग्रह भारी असेल तर अजिबात बुधवारी हे काम करू नये, हे संकटांना आमंत्रण असू शकते.

२. सासरच्या नात्यांवर परीणाम होऊ शकतो

बुधवारच्या दिवशी अजिबात मुलीला सासरी पाठवू नये यांमुळे तिच्या सासरच्या नात्यांवर परीणाम होऊ शकतो. प्रत्येक आई वडीलांना हेच वाटत असते की मुलीने सासरी खुष राहावे आणि तिच्या वाट्याला कोणतेही दुःख येऊ नये आणि म्हणून माहेरी आलेल्या मुलीला कधीही बुधवारच्या दिवशी सासरी पाठवू नये.

३. वाटेत अडथळे

बुधवारी कधीही मुलीला सासरी पाठवू नये, असे केल्याने रस्त्यात अडचणी किंवा वाईट प्रसंग येण्याची शक्यता असते.

४. आजारपण

जर मुलीला सासरी बुधवारी पाठवले तर तिच्या आरोग्यावर वाईट परीणाम होऊ शकतो. म्हणूनच माहेरी आलेल्या मुलीला सासरी बुधवारी पाठवण्याची चूक कधीही करू नये.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.