मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती, आज आपण अक्षय कुमार यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटो विषयी बोलणार आहोत, त्यांनी तो फोटो शेअर करताना असे बोलले आहेत की “मॉर्निंग वॉक दरम्यान माझ्या लहान मुलीला जीवनाचा धडा शिकायला मिळाला….!”, तर चला त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार यांनी आज आपली मुलगी नितारा हिच्याबरोबर एक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली, जी इंटरनेटवरती लोकांना प्रभावित करत आहेत.
अक्षयने सांगितले की आज सकाळी तो मुलगी नितारा सोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. त्या दरम्यान, तो पाणी पिण्यासाठी एका वृद्ध जोडप्याच्या घराबाहेर पोहोचला. झोपडी सोडण्यापूर्वी त्या गरीब जोडप्याने त्यांना गुळाची भाकरी दिली, जे खाल्यावर अक्षय खूप खुश झाला. या जोडप्याच्या सेवेमुळे खूश झालेल्या अक्षयने मुलगी नितारासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले की, “मॉर्निंग वॉक दरम्यान माझ्या लहान मुलीला जीवनाचा धडा शिकायला मिळाला. आम्ही या जोडप्याच्या घरी पाणी पिण्यासाठी गेलो आणि त्यांनी आमच्यासाठी गुळ व भाकर आणली. तो खरोखर एक चांगला अनुभव होता. नम्र असण्यात कोणतेही नुकसान नाही आणि तेच सर्व काही आहे. फोटोमध्ये अक्षय आणि नितारा या जोडप्या समवेत पोज देताना दिसत आहेत. अक्षय कुमारच्या या इंस्टा पोस्टला 10 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत आणि लोकही या जोडप्याचे कौतुक करत आहेत.
मित्रांनो तुम्हाला त्या वृद्ध जोडप्याच्या विषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.