पाल दोन दिवसात घरात एकही दिसणार नाही, असा खात्रीशीर उपाय…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला घरातील पाल घालवण्यासाठीचे काही सोपे उपाय सांगणार आहोत व ते उपाय वापरून तुम्ही नक्कीच पालीला घरातून बाहेर काढू शकता, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. तुम्हाला तर “पाल” विषयी माहीतच आहे, घरातील महिलांसाठी पाल ही एक मोठी समस्या असते, तिला घरातून कसे बाहेर घालवावे, हाच विचार त्यांच्या डोक्यात चालू असतो. तर आज आपण त्यासाठी काही घरगुती उपाय करणार आहोत जे केल्याने नक्कीच पाल आपल्या घरातून बाहेर निघून जाईल. हे उपाय खूप कमी खर्चिक आहेत आणि साधे व सोपे असे हे उपाय आहेत.

पहिल्या उपाय, उपाय तयार करण्यासाठी लागणार आहे “काळी मिरी”….!! सर्व प्रथम एका ग्लास मध्ये थोडे पाणी घ्या, नंतर थोडीशी काळी मिरी घेऊन ती एका ग्लास मधील पाण्यात ती टाकून द्या, व ती काळी मिरी त्या पाण्यामध्ये चार ते पाच तास भिजवत ठेवा, म्हणजे जेणे करून काळी मिरी मधील घटक त्या पाण्यात उतरतील व आवण त्या पाण्याचा स्प्रे म्हणून उपयोग करू. आणि ज्या ठिकाणांहून पाल घरामध्ये येते तिथे हा स्प्रे मारून घ्यायचा व जिथे जिथे आपल्याला पाल फिरताना दिसते तिथे तिथे हा स्प्रे मारून घ्यायचा. त्यामुळे तुमच्या घरातून पाल निघून जाईल कारण काळी मिरी चा वास खूप उग्र आहे व त्या वासामुळे पाल नक्की घर सोडून जाईल त्याचबरोबर नवीन पाल देखील दिसणार नाहीत.

दुसरा उपाय तयार करण्यासाठी लागणार आहे कांदा….!! दोन कांदे घेऊन त्याचे स्लाइस बनवून घ्या, आणि त्याला दोरी बांधून ज्या ठिकाणी जास्त लाईट असते शक्यतो त्याच ठिकाणी जास्त पाली असतात. ज्या ठिकाणी जास्त लाईट असते त्या ठिकाणी कांदा दोरीच्या सहाय्याने लटकत ठेवा व यामुळे त्या लटकत ठेवलेल्या कांद्याच्या उग्र वासाने पाल घरामध्ये थांबणार नाही. हे कांद्याचे स्लाइस ठीक ठिकाणी लटकवून ठेवले तर या कांद्याच्या उग्र वासाने पाल आपल्या घरात राहणार नाही.

तिसरा उपयोग तयार करण्यासाठी लागणार आहे लसूण……!! एक लसूण आणि त्याच्या सोबत एक कांदा घेऊन तो ठेचून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा, आणि एक कप पाण्यामध्ये ते बारीक केलेल्या मिश्रणातील रस कपड्याच्या सहाय्याने गळून घ्यायचा जसे आम्ही पहिल्या उपायमध्ये सांगितल्या प्रमाणे त्याचा स्प्रे बनवून घ्यायचा आणि हे स्प्रे ज्या ठिकाणी जास्त पाल दिसतात किंवा जिथून पाल येतात तिथे हा स्प्रे करायचा, यामुळे आपल्या घरातील पाल निघून जाणार आहे.

मित्रांनो आम्ही अशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.