दूध प्यायल्यानंतर, दुधाबरोबर चुकूनही हे पदार्थ खाऊ नका…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती दुधामध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. यामध्ये असलेले कॅल्शियम आपले हाडे आणि दात यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु कधीकधी आपण दुधाबरोबर अशाच काही गोष्टींचे सेवन करतो ज्या आपल्या शरीरास हानी पोहचवतात. आज आम्ही तुम्हाला दुधाबरोबर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत . तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

दूध पिण्यापूर्वी व नंतर किंवा पिताना त्याच्या सोबत कधीही फळे, पदार्थ खाऊ नयेत. यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही आणि उलट्या होण्याची शक्यता असते. दूध आणि मासे कधीही एकत्र खाऊ नयेत कारण ते गॅस, ऍलर्जी आणि त्वचेशी संबंधित रोगांना कारणीभूत ठरू शकतात. कधीही दुधाबरोबर दही खाऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास गॅस आणि उलट्या होऊ शकतात. दही खाल्ल्यानंतर एक ते दीड तासांनी दूध प्यावे. याशिवाय उडीद डाळ बरोबर कधीच दूध पिऊ नये.

दूध आणि केळी देखील खाऊ नये कारण दूध आणि केळी दोन्ही कफ बनवतात. दोन्ही एकत्र खाल्ल्याने कफ वाढते आणि पचनही प्रभावित होते. जर आपण दुधासह तळलेले किंवा भाजलेले तांबूस पिवळट पदार्थ खाल्ले तर ते पचनासाठी सोपे नाही. ते खाल्ल्याने त्वचेचे आजार उद्भवू शकतात. दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *