मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला मुरली शर्मा यांच्या विषयी माहिती सांगणार आहोत, मुरली शर्मा यांनी एका मराठी अभिनेत्रीशी लग्न केले आहे व ती अभिनेत्री दिसायला देखील खूपच सुंदर आहे, तर चला त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. मुरली शर्मा हा एक भारतीय चित्रपटाचा अभिनेता आहे जो बॉलिवूड, तेलगू चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये मुख्यत्वे आपल्या कामांसाठी ओळखला जातो. तो पडद्यावर एक कॉप चित्रित करण्यासाठी प्रसिध्द आहे आणि देश भरातील लोक त्याला त्याच्या पिढीतील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व कलाकार म्हणून ओळखतात.
तेलुगू, तामिळ, मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुरली शर्मा ‘ढोल’, ‘वजीर’, ‘जय गंगाजल’, ‘सिंघम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘दबंग’ ‘मकबूल’, ‘मार्केट’, ‘मैं हूँ ना’, ‘अपहरण’, अशा अनेक बड्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत. मुरली यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ते मीडियापासून दूर राहणेच पंसत करतात. आणि विशेष म्हणजे मुरली शर्माचे लग्न एका मराठी अभिनेत्री सोबत झाले असून, या अभिनेत्रीने मराठी सोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ती छोट्या पडद्यावर देखील झळकली आहे. व या अभिनेत्रीचे नाव आहे अश्विनी कळसेकरने…….!!
तुम्हाला कदाचित अश्विनी कळसेकर नावाने माहित नसेल पण तुम्ही तिला बर्याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये पाहिले असेलच. अश्विनीने मुरली शर्माशी 2009 मध्ये लग्न केले. मुरली यांना तुम्ही बर्याच चित्रपटात नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिले. मुरली यांनी बॉलिवूडच्या बर्याच चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे, विशेष म्हणजे मुरली आणि अश्विनी या दोघांनी गोलमाल चित्रपटात एकत्र काम केले आहे. परंतु अश्विनीने 1998 साली ‘नितीश पांडे’ बरोबर लग्न केले होते. दोघेही 4 वर्षे एकत्र राहिले होते पण त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत. होय … नितेश आणि अर्पिताच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांचा घटस्फोट झाला असे म्हटले जाते. पण यावर नितेश आणि अश्विनी यांनी नेहमीच न बोलणेच पसंत केले.
घटस्फोटानंतर अश्विनी एका बिझनेसमनसोबत नात्यात होती असे म्हटले जात . पण हे नाते काहीच काळ टिकले. त्यानंतर मुरली तिच्या आयुष्यात आला. त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले. आता मुरली आणि अश्विनी पहिल्यांदाच या जोडप्याच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहेत. होय …. दोघेही लवकरच ‘मेहबुबा’ या तमिळ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
मित्रांनो तुम्हाला मुरली शर्मा यांचा अभिनय कसा वाटतो ते कमेंट करू नक्की कळवा.