विंचू चावल्यानंतर कोणते करावेत घरगुती उपाय जाणून घ्या…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात, किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्या सारख्या वाटत असतील…. तर या वेदना संपुष्टात आणण्यासाठी (विष उतरवण्यासाठी) उपाय सांगणार आहोत व तो उपाय केल्याने तुम्हाला त्या वेदनांनपासून नक्की आराम मिळेल, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.  प्रथम विंचू चावल्यावर काय होते ?  ते जाणून घेऊया…

शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात.

विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरवण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे ‘चिंचुके’…..!! होय जी चिंच असते व त्या चिंचेमधील जो बी असतो त्याला चिंचुके म्हणतात. या चिंचुकेचे वरील जे टरफल (आवरण) ते काढून टाकायचे आणि ते काढल्यानंतर जो पांढरा भाग आपल्याला दिसतो, तो दगडावरती चांगल्या प्रकारे घासून ज्या ठिकाणी विंचू चावला आहे. त्या ठिकाणी हा घासलेला पांढरा भाग धरून ठेवायचा. आणि जोपर्यंत आपल्याला थोडे बरे वाटत नाही तोपर्यंत तो चिचुका तसाच धरून ठेवायचा.

दुसरा उपाय आहे ‘तुरटी’…!! तर आपल्याला चिंचुके सापडले नाही तर तुम्ही तुरटी देखील वापरू शकता. तुरटीचा खडा घेऊन ती गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती धरून ठेवायचा जेणे करून तुरटी पाघळू लागेल. आणि तुरटी वितळू लागली की ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आणि ही तुरटी त्या भागाला चिटकून बसेल, नंतर जो पर्यंत त्या विंचवाचे विष निघून जात नाही, तोपर्यंत ही तुरटी तशीच धरून ठेवायची. ज्यावेळी सर्व विष उतरून जाईल त्यावेळी आपोआप तुरटी खाली पडणार.

या उपायामुळे जर फरक न पडल्यास ,लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास तसेच इंगळीने म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास, लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो हे होते विंचू चावल्यावर करण्याचे उपाय तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.

By Admin

One thought on “विंचू चावल्यानंतर कोणते करावेत घरगुती उपाय जाणून घ्या…

  • विंचू चावला ? घाबरू नका …आमचाही घरगुती उपाय ..

    शरीराच्या कोणत्या भागावर विंचू चावला आहे ते पाहावे . बाधीताला विरुद्ध बाजूस एका अंगाडावर झोपवावे . प्रत्येकाच्या घरी मीठ असतेच . [ खडा मीठ असल्यास उत्तम ] कपात /वा वाटीत थोडस पाणी घेऊन त्यात थोडस मीठ मिसळाव . मीठ पाण्यात ताबडतोब विरघळत . विरुध्द बाजूच्या कानात दोन तीन थेंब टाकावेत . कानात पाणी जस जस आत जाईल , त्यानुसार विषही हळू हळू उतरत जाईल . झिणझिण्र , असल्यास परत एकदा कानात दोन तीन थेंब टाकावेत , फरक पडतो . यात वयाची अट नाही . आलेला पेशंट हसत-आभार मनात परत जातो . हा उपचार दिवस असो वा रात्र – आमच्या घरातील सर्वजण कित्येक वर्षापासून आज अखेर करत आहेत , त्यात खंड पडला नाही . स्वानुभव हीच खात्री !

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.