नागराज मंजुळे यांचा “फँड्री” हा चित्रपट चांगलाच गाजला, आणि या चित्रपटाला काही पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने शालूची भुमिका साखारली. हा चित्रपट जातीवर आधारीत असून त्यांच्यातील प्रेम कहाणी यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटींग अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात झाले आहे. नागराज मंजुळे यांना शालू साठी पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. परंतु काही दिवसानंतर त्यांना पुण्यात राजेश्वरी खरात दिसली. त्यांनी शालूची भूमिकेसाठी राजेश्वरी खरात हिची निवड केली.
राजेश्वरी खरात हिच्या घरचा पत्ता शोधून त्यांनी आई वडिलांशी बोलून तिच्याशी शाळूच्या भूमिकेसाठी विचारणा केली. आणि तिच्या आई वडीलांनी होकार दिला. जेव्हा राजेश्वरी खरात हिने फँड्री या चित्रपटाचे काम चालू केलं, तेव्हा ती नववीत होती. तिने आपले शिक्षण जोग युनिव्हर्सिटी पुणे येतून पूर्ण केले आहे. आणि सिंहगड कॉलेज मधून तिने B. COM केलं आहे. फँड्री या चित्रपटात विषेश म्हणजे तिचा एकही डायलॉग नाही. तरीसुद्धा तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या चित्रपटामुळे तिला विषेश अशी ओळख मिळाली आहे.
नागराज मंजुळे यांच्या फँड्री या चित्रपटाला अजूनही लोक विसरले नाहीत. फँड्री या चित्रपटानंतर तिला दोन वर्षांनी तिला “आयटम” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटात तिने हंसराज जगताप यांच्या बरोबर काम केलं आहे. आता ती अजून काही चित्रपटांसाठी काम करत आहे. ह्या अभिनेत्री अभिनयाचं कसलाही गंद नसताना ती अभिनय क्षेत्रात उतरली आहे. ती पुण्यात आपल्या आईवडिलांसोबत राहते. तिचे वडील बँकेत कामाला असतात.
अभिनयाचं कसलाही वारसा नसताना तिने यात खूप नाव कमावले आहे. फँड्री चित्रपट करताना ती खूपच लहान होती. परंतु आता ती मोठी झाली असून ती पहिल्यापेक्षा आता खूपच सुंदर दिसत आहे. मित्रांनो तुम्हाला राजेश्वरी खरात हिच्या अभिनयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
So cutee
job mi
Nice
Ms dhoni
SO NICE PICTURE AND NICE LOOK RAJESHWARI
I like her goal and look, Beautiful .
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.