‘तेरे नाम’ चित्रपटाविषयी या खास गोष्टी ९०% लोकांना माहिती नसतील, जाणून घ्या…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आपण ‘तेरे नाम’ या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. आज आपण ‘तेरे नाम’ चित्रपटातील काही खास अशा 6 गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्या विषयी फक्त 90% लोकांना माहिती असेल, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि भूमिका चावला यांचा चित्रपट ‘तेरे नाम’….! हा तेरे नाम चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर होता. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित होता. जी प्रेम कथा सर्व प्रेक्षकांनाच खूप आवडली होती.

तर चला आजच्या ह्या आर्टिकल मध्ये तेरे नाम या चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ :- 1. ‘तेरे नाम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचा लेखक बाला यांच्या एका मित्राला मुलीने प्रेमात धोका दिल्यानंतर त्याने त्याची मानसिकता गमावली होती आणि त्या नंतर त्या मित्राला मानसिक आश्रया मध्ये दाखल केले गेले. आपल्या मित्राच्या प्रेरणेने बाला यांनी ही स्क्रिप्ट लिहिली. 2. 2004 मध्ये ‘तेरे नाम’ चित्रपटाला सर्वाधिक एडवांस बुकिंग मिळाले होते. 10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 24 कोटींचे कलेक्शन केले. त्या वेळची ही एक खूप मोठी कमाई होती.

3. ‘तेरे नाम’ चित्रपटासाठी सर्वात प्रथम ‘अजय देवगन’ आणि ‘अमीषा पटेल’ यांची पहिली पसंती होती. परंतु नंतर सलमान खान आणि भूमिका चावला यांना मुख्य भूमिकेत घेतले गेले. 4. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री डेझी शाह सलमान खानसोबत ‘जय हो’ या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये दिसली होती. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ‘तेरे नाम’ चित्रपटातील एका गाण्याच्या दरम्यान सलमान खान यांच्या मागे ती नाचताना दिसली होती. 5. सलमान खानचा ‘तेरे नाम’ चित्रपट आणि ‘वॉन्टेड फिल्म’ यामध्ये एक संबंध आहे. तो म्हणजे ‘वांटेड’ चित्रपटामध्ये महेश वर्मा यांनी गुंडांची भूमिका केली होती आणि ‘तेरे नाम’ चित्रपटात देखील सलमानचे डोके ट्रेनवर आदळतेल्या सीन मध्ये तीच भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे सलमान खानसुद्धा त्या गुंडांच्या डोक्यावर वार करून बदला घेताना दिसले आहेत.

6. ‘तेरे नाम’ चित्रपटात सलमान खानची हेअरस्टाईल खूप लोकप्रिय झाली. तुमच्या माहिती करीता सांगू इच्छितो की पटना थिएटरमधील एका प्रेक्षकाला हा चित्रपट पाहून इतका आनंद झाला, की त्याने आपल्या हातावर एक काचेची बाटली फोडली होती.

मित्रांनो तुम्हाला ‘तेरे नाम’ हा चित्रपट कसा वाटला, ते कमेंट करुन आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.