‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मृणालबद्दल बरेच काही!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, “कलर्स मराठी” वरील ‘सुखाच्या सरी मन बावरे’ ही मालिका लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. प्रेक्षकांचे या मालिकेला विशेष प्रेम मिळत आहे, कारण या मालिकेतील सर्वच कलाकारांचा देर्जेदार असा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक या कलाकारांना अगदी भरभरून प्रेम देत आहेत. या मालिकेतील नायक आणि नायिका या दोघांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे, तर आज आपण मालिकेतील नायिका अनु विषयी म्हणजेच “मृणाल दुसानिस” विषयी माहिती जाणून घेणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

अभिनेत्री ‘मृणाल दुसानिस’ हिचा जन्म 20 जून 1988 रोजी नाशिक मध्ये झाला असून, तिचे शालेय शिक्षण नाशिक मधील ‘मराठा हायस्कुल’ मधुन पूर्ण झाले आहे. आणि महाविद्यालयीन शिक्षण ‘HPT कॉलेज’ मधून पूर्ण झाले आहे. पुढे तिने जर्नलीझम मध्ये मास्टर्स पूर्ण केले. अभिनयाची लहापणापासूनच आवड असल्यामुळे मृणाल शाळा आणि कॉलेजमध्ये विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये सहभागी होत होती. नाटकांमध्ये काम करताना अभिनयाची रुची आणखीन वाढली, पुढे जाऊन अभिनयामध्येच करियर करायचे असे तिने ठरवले. अभिनयातील आपले ध्येय गाठण्यासाठी मृणाल मुंबई मध्ये आली, मुंबईत तिला काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

 

टीव्ही मालिकांच्यासाठी ऑडिशन देत असताना, झी मराठी वरती तिला प्रथम संधी मिळाली, झी मराठी वरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून आपले अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केले. या मालिकेत शमिका ही प्रमुख भूमिका साकारली होती, आपल्या सह सुंदर अभिनयाने पहिल्याच मालिकेत तिने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांचे तिच्यावरील प्रेम पाहता झी मराठीने मृणाल ला आणखी एका मालिकेत संधी दिली ती मालिका म्हणजे “तू तिथे मी” या मालिकेत, तिने मंजिरी भूमिका साकारली होती, अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांच्यासोबत तिला या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या मालिकेत देखील तिने प्रेक्षकांची पुन्हा एकदा मने जिंकली.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून मृणाल ने सर्वांनाच आपल्या अभिनयाची झलक दाखवली. अभिनयासोबत तिला नृत्याची आणि गाण्याची प्रचंड आवड आहे, प्रोफेशनल गायिका नसली तरी देखील गाण्यावर तिचे खूप प्रेम आहे. तसेच नृत्यात देखिल मृणाल पारंगत आहे, ‘एका पेक्षा एक’ या रियालिटी शो मध्ये तीने सहभाग घेतला होता, तिच्या नृत्याचे देखील खूप कौतुक झालेले आहे. अमिरीकेमध्ये झालेल्या नाट्य संमेलनात तिने सहभाग घेतला होता, आणि तेथील प्रेक्षकांचे प्रेम पाहून तिला खूप आनंद देखील झाला होता. त्याच बरोबर तिने धुंद हवा या ‘music album’ मध्ये देखील काम केले आहे, ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोमध्ये मृणाल ने निवेदिका म्हणून काम केले आहे.

कलर्स मराठी वरील ‘असं सासर सुरेख बाई’ या मालिकेत मृणाल ला पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये जुई नावाचे पात्र तिने साकारले आहे, अभिनेता संतोष जुवेकर आणि मृणाल या दोघांची जोडी प्रेक्षकांना बरीच पसंतीस उतरली होती. या मालिके दरम्यान मृणाल चे लग्न ठरले त्यामुळे तिला ही मालिका मध्येच सोडावी लागली. 25 फेब्रुवारी 2016 ला अमेरिकास्थित नीरज मोरे या यांच्याशी मृणालचा विवाह झाला. मृणाल चा पती पुण्याचा असून तो एक इंजिनियर आहे, परंतु नीरज हा नोकरी निमित्त अमेरिकेला असतो. मृणाल ही संस्कारिक आणि आणि अध्यात्मिक मुलगी आहे, तिचा देवावर विश्वास आहे आणि वेळ मिळेल तशी ती देवाची पूजा करत असते.

आपण नेहमी पाहतो की तिचे वागणे, बोलणे किती साधे असते, हा साधेपणा तिच्या अभिनयात आपल्याला पाहायला मिळतो. हिचा आवाजही खूप गोड असल्याने हिच्या अभिनयात ‘चार चांद लागतात’, प्रेक्षकांनाही तिचा आवाज खूप आवडतो मायदेशी परत आल्यानंतर तीने मराठी कालाविश्वात पुनरागमन केले. कलर्स मराठीवर चालू असलेल्या ‘सुखाच्या सरीनी हे मन बावरे’ या मालिकेतही मृणाल आपल्या अभिनयाने आणि गोड आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे, या मालिकेत तिने ‘अनुश्री’ म्हणजेच “अनु” ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिच्या सोबत मुख्य भूमिकेत “शशांक केतकर” असून त्याने ‘सीदार्थ’ हे पात्र साकारले आहे.

मित्रांनो तुम्हाला मृणाल दुसानिस हिच्या अभिनयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.