कच्चा लसूण खात असाल तर एकदा ही माहिती वाचाच…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाण्याचे कोण कोणते फायदे आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. तर चला याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, सर्व साधारणपणे आपण लसूण चा उपयोग आपण भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी करतो. एखाद्या बेचव भाजीमध्ये जेव्हा लसूण घातला जातो तेव्हा ती भाजी देखील खूप चविष्ट बनते.

लसूण मध्ये अशी काही गुणकारी तत्वे आहेत ज्यामुळे आपला अनेक विकारांनपासून बचाव होतो. आयुर्वेदामध्ये लसूण ला wonder food असे म्हंटले आहे, आणि लसूण चा उपयोग औषधी म्हणून केला गेला आहे. पण या औषधाचा सर्वात जास्त उपयोग सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खाल्याने होतो. लसूण ही हृदयरोगाशी संबंधित तक्रार दूर करण्यासाठी मदत करते, लसूण खाल्याने रक्याच्या गाठी बनत नाहीत, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची तक्रार देखील कमी होते. डायरीत किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्टता या दोन्ही पोटाच्या तक्रारी मध्ये लसूण उपयोगी पडतो, यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते माहिती जाणून घ्या.

एक ग्लास पाण्यामध्ये पाच लसूणच्या पाकळ्या टाकून ते पाणी सात ते आठ मिनिटे उखळून घ्यायचे आणि थोड्या वेळाने ते पाणी कोमट झाल्यानंतर प्यायचे आणि या लसूणच्या पाण्यामुळे पोटातील तक्रारीतून आराम मिळेल, तसेच या पाण्याच्या सेवनाने शरीरामधील घातक पदार्थ बाहेर टाकले जातात. लसूण नियमित खाल्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते, आणि ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना ते नियंत्रित ठेवणे शक्य होते. लसूणच्या सेवनाने पचन शक्ती सुद्धा चांगली राहते, ज्यांना अपचनाचा त्रास आहे किंवा ज्यांना कमी भूक लागते, अश्या व्यक्तींमध्ये रिकाम्या पोटी लसूण चावून खाणे फायद्याचे ठरते.

लसूण मध्ये anti bacterial आणि वेदना कमी करणारे तत्वे असतात, श्वासनासी संबंधित विकारांसाठी लसूण खाल्याने खूप फायदा होतो. खोकला, अस्थमा, किंवा ब्रँकायटीस यामध्ये लसूणचे सेवन खूप फायदेशीर ठरते. आणखीन एक महत्वाचे म्हणजे ज्या लिकांना हृदयाच्या आजाराच्या दृष्टीने रक्त पातळ होण्याची गोळी सुरू आहे अश्या लोकांनी जास्त कच्च्या लसूणचे सेवन करू नये, कारण लसूण मध्ये सुद्धा रक्त पातळ करणारे तत्वे असतात. लसूण मध्ये vitamin A, vitamin B, Vitamin C असतात, तसेच potassium, calcium, iron, iodine, magnesium, यांसारखी पोषक तत्वे भेटतात. लसूण शरीरातील इन्सुलेन चे प्रमाण वाढवते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
मित्रांनो हे आहेत रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

4 Comments on “कच्चा लसूण खात असाल तर एकदा ही माहिती वाचाच…”

  1. रोज किती पाकळ्या खाव्यात… आणि किती दिवस सेवन करावे…जास्त दिवस पाकळ्या खाल्ल्याने मुळव्याधाचा त्रास होईल का ?

Leave a Reply

Your email address will not be published.