आरोग्यदायी पालक भाजी, जाणून घ्या पालक भाजीचे जादुई फायदे….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हांला पालक खाण्याचे फायदे सांगणार आहोत. पालकमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, vitamin A, vitamin B, Vitamin C, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असते. व या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकारक अशी भाजी आहे. मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातुन जेवढ्या प्रमाणात प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने पालकातून मिळतात.

पालकात हे रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्त कण निर्माण होण्याची प्रक्रिया जलद सुरू होते. तसेच पालक रक्त तर शुद्ध करतेच व त्याबरोबर हाडे देखील मजबूत बनतात. Vitamin A परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. पालक हे ‘हृदयविकार’ आणि ‘आतड्याच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी’ भाजी आहे.  पालक खाल्याने ‘मेंदूच्या कार्यशक्त्तीमध्ये नियमितता’ येते.  पालकमधील vitamin K मुळे हाडांच्या ठिसुळपनात मदत होते.

पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, Vitamin C ‘ व vitamin K ‘ असल्याने गर्भवती महिलांसाठी ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे. पालकांच्या 25 ml रसात गाजराचा 50 ml रस मिसळून पिल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. पालकाचा रस काढून ते पाण्यात मिसळून रोज गुळण्या केल्या तर दातातून रक्त येणे थांबते आणि दात दुखायचे कमी होते, हे आहेत पालक खाण्याचे फायदे.
मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *