हेमा मालिनीला या कारणामुळेच शोलेचा ठाकूर आवडत नव्हता…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला म संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यातील एक किस्सा संगणार आहोत, असे म्हटले जाते संजीव कुमार हे हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. आता जर तुम्ही शोले चित्रपटाचया फ्लॅशबॅक मध्ये गेलात तर तुम्हाला आठवेल की या चित्रपटात संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांचा एकही सीन नाही.

हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल उगाचच म्हटले जात नव्हते. त्यांच्यात एक जादू होती, ज्यामुळे केवळ प्रेक्षकच नव्हे तर, त्यांच्या कोस्टार्स ना देखील त्यांनी वेडे केले होते. हेमाच्या प्रेमात पागल असलेल्यांमध्ये राजकुमार, जीतेंद्र आणि संजीव कुमार अशी मोठी नावे होती. परंतु हेमा यांनी धर्मेंद्रची निवड केली. पण एक नायक होता जो त्याच्यामुळे आयुष्यभर बॅचलर राहिला. असे म्हणतात की संजीव कुमार हे सुंदर अभिनेत्री हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते. ते त्यांच्याबरोबर आयुष्य घालवण्याचे देखील स्वप्न पाहत असत, संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला लग्नाचा प्रस्तावही दिला होता. पण हेमा यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. यानंतर संजीव कुमार यांनी कधीही लग्न केले नाही.

संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या बद्दल आणखी एक किस्सा सांगितला आहे. असं म्हंटले जाते की संजीव यांना हेमा खूपच आवडत हाती. त्यांनी आपले प्रेम दाखवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होता. पण हेमा यांना हे आवडले नाही. त्यामुळे त्यांनी शोले चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, चित्रपटात संजीव कुमार सोबत त्यांचा एक ही सीन यायला नको.

आता जर तुम्ही शोलेच्या फ्लॅशबॅक मध्ये गेलात तर तुम्हाला आठवेल की प्रत्यक्षात चित्रपटा मध्ये संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांचा एकत्रित एकही सीन नाही. ते फक्त होळीच्याच सीनमध्ये दिसले आहेत. तिथे देखील हेमा ह्या ठाकूर संजीव कुमार यांच्यापासून खूप दूर दिसतात. मित्रांनो तुम्हाला संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या बद्दल काय वाटते ते कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *