वजन कमी करायचे नो टेन्शन, पहा वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, चुकीच्या आहार पद्धतीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे बऱ्याच वेळा आपल्या शरीराचे वजन वाढते आणि बऱ्याच वेळा ते जास्त वाढू लागते व त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. म्हणून आज आपण वजन कमी करण्यासाठी नेमके काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत या बद्दल माहिती घेणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी टोमॅटो खूपच उपयुक्त ठरतात, रोज सकाळी उपाशी पोटी एक ते दोन पिकलेले टोमॅटो खाल्ले तर आपले वजन कमी होऊ शकते. याने आपले वजन तर कमी होतेच पण त्याच बरोबर आपल्या शरीराला पोषक तत्वे देखील मिळतात, आणि आपली त्वचा देखील मऊ आणि चमकदार बनते. वजन कमी करण्यासाठी लिंबू खूपच उपयुक्त ठरतो, रोज दिवसातून दोन वेळा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि एक ते दीड चमचे मध हलवून घेतल्याने हमखास वजन कमी होते. वजन कमी करताना

स्टेच मार्क्स येणे त्वचा सैल पडणे. असे परिमाण देखील लिंबूमुळे आपल्याला टाळता येतात. आपण या पाण्यामध्ये थोडीशी काळामीरी पावडर घालून सुद्धा हे पाणी घेऊ शकतो. हे सुद्धा वजन कमी करायलाच खूपच उपयुक्त ठरते, रोज जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचे सूप घेतल्याने वजन कमी करायला खूपच मदत होते. कोबीमुळे अन्नातील साखर आणि कार्बोहाइड्रेटचे रूपांतर फॅट्समध्ये होत नाही, आणि त्यामुळे वजन कमी करायला खूपच परिणाम कारक ठरते. ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी कोबी खाणे टाळावे. दोन ते तीन लसूण च्या पाकळ्या, आल्याचा रस, थोडे सैधंव आणि तुपात भाजलेले हिंग हे एकत्रित करून घेतल्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. वाढलेले पोट देखील कमी होते.

अर्धा ग्लास पाण्यात तीन कोकम भिजवावेत नंतर त्यात अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा ओवा पावडर, एक चमचा बडीशेप पावडर आणि हिंग घालून हे एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आणि वजन कमी करण्यास एक रामबाण उपाय आहे, आहारात नियमित पालक, पपई, दही, पेरू, कांदा, लसूण, दालचिनी, मध अश्या गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे. आपण ज्यास्तीत ज्यास्त फायबरयुक्त पदार्थांची समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. मांसाहार, तेलकट, गोड, मैद्याचे पदार्थ आणि बाहेरचे फास्ट फूडशक्यतो टाळावे. जेवण अगदी मनापासून आणि चावून चावून खावे रात्रीचे जेवण शक्यतो हलके असावे आणि जेवल्यानंतर दोन तासां नंतरच झोपावे, जर आपण जेवणाच्या वेळा सांभाळल्या तर वजन वाढण्याचे प्रमाण कमी होईल.

वजन कमी करायला पावडर मसाज खूपच उपयुक्त ठरते, सुंठ, अर्जुन, त्रिकुट, नागरमोथा आणि आंबेहळद हे सर्व एकत्रित करून त्यात थोडेसे तिळाचे तेल घालून सर्व अंगाला याचा मसाज करावा. आणि त्यानंतर व्यायाम करून मगच अंघोळ करावी याने वजन कमी होण्यास मदत होते. रोज भरपूर आठ ते दहा ग्लास गरम पाणी पीने सुद्धा खूप गरजेचे आहे. यामुळे यामुळे सुद्धा फॅट लॉस होऊन वजन कमी होते.

मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली का ते कमेंट नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.