मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील कॉमेडियन गोविंदा यांच्या जीवना विषयी थोडी माहिती सांगणार आहोत, तुम्हाला माहीत आहे का ? की गोविंदाला या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे झाले होते, आणि कोणत्या कारणांमुळे त्यांना सुनिताशी लग्न करावे लागले. तर चला आपण या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. बॉलिवूड मधील कॉमेडियन गोविंदा हे जरी बरेच दिवस झाले चित्रपटांपासून दूर असेल तरी देखील ते 80 आणि 90 च्या दशकाचा सुपरस्टार होते.
एक काळ असा होता की, त्यांच्या ‘गोविंदा’ या नावाखालीच चित्रपट, बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत होता. बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी 1987 मध्ये सुनीता आहूजा यांच्याशी लग्न केले होते. सुनीता आणि गोविंदा यांना टीना आणि यशवर्धन आहूजा ही दोन मुले आहेत. आपल्याला गोविंदा आणि सुनीताच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल माहिती तर असलेच परंतु तुम्हाला हे माहीत नसेल की सुनीताशी लग्न होण्यापूर्वी गोविंदा नीलम कोठारी या अभिनेत्रीवर प्रेम करत होते. 80 च्या दशकात गोविंदा आणि नीलम हे दोघे एकाच वेळी बर्याच चित्रपटांमध्ये दिसले होते.
बातमीनुसार गोविंदा नीलमच्या इतक्या प्रेमात पडले होते की गोविंदा यांना नीलमशी लग्न करायचे होते. पण दोघांच्या लग्नात बऱ्याच अडचणी आल्या. खरे तर, गोविंदाच्या आईला नीलम आवडत नव्हती आणि त्यांना गोविंदाचे लग्न बॉलिवूड दिग्दर्शक आनंद सिंह च्या मेव्हणीशी करायचे होते.
सुनीता ही चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद सिंह यांची मेहुणी आहे. गोविंदाने आईला समजावण्याचा प्रयत्न केला पण आईने ऐकले नाही.
गोविंदा आणि नीलम यांचा पहिला चित्रपट 1986 मध्ये आला होता. तथापि, गोविंदा आणि नीलम यांचे लग्न नाही होऊ शकले, आणि गोविंदाने निर्मलाशी लग्न केले, तर नीलमने समीर सोनीशी लग्न केले. मित्रांनो तुम्हाला बॉलिवूड मधील कॉमेडियन गोविंदा यांच्या लग्ना अगोदरच्या प्रेमा विषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.