जर रात्री या कारणासाठी उठत असाल, तर एकदा हि माहिती वाचाच…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आपण जर रात्री झोपलेलो असेल आणि अचानक जर आपल्याला मूत्र विसर्जन म्हणजेच लघवी साठी जायचे असेल आणि आपण जर ताबडतोब उठून लघवीला जात असाल तर अश्या वेळेस आपण नक्की कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल आज आम्ही माहिती सांगणार आहोत. अश्या अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये एकादी व्यक्ती रात्री लघवी साठी उठते आणि त्यामूळे लघवीला जातानाच त्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे. काही व्यक्ती खाली कोसळल्या आहेत आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.

तुम्हाला माहित आहे का की असे का घडत आहे यामागे नक्की वैद्यांनीक कारण काय आहे आणि असे होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव आपण वाचवू शकतो.  ज्यावेळी आपण गाढ झोलेलो असतो त्यावेळी आपल्याला अचानक जाग येते आणि आपण लघवी साठी म्हणून जातो आणि त्यामध्ये चक्कर येऊन आपण खाली कोसळतो आणि आपला त्या ठिकाणी मृत्यू होतो. अश्या प्रकारच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत आहेत आणि त्याचे वैज्ञानिक कारण असे आहे की ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची पोसिशन म्हणजे सावट असते त्यामुळेच हृदयाकडून आपल्या मेंदूला ज्यास्त प्रमाणामध्ये रक्ताचा पुरवठा होत असतो.

ज्यावेळी आपल्याला जाग येते आणि आपण ताबडतोब उठून उभे राहतो आणि लघवीसाठी जायला निघतो, त्यावेळी मेंदूला होणार हा रक्ताचा पुरवठा अचानक कमी प्रमाणात होऊ लागतो, कारण आपण उभे राहिलेलो असतो त्या पूजिशन मध्ये खाली असणाऱ्या हृदयाकडून वरती असणाऱ्या आपल्या मेंदूला रक्ताचा पुरवठा तितक्या प्रमाणात होत नाही जितक्या प्रमाणात आपण झोपलेल्या अवस्थेत होत होता. आणि हेच कारण आहे की आपल्याला असे अचानक उठल्यानंतर चक्कर येते आणि हा रक्ताचा पिरवठा जर खूपच कमी प्रमाणात झला, आपण जर खूप वेगाने उठलो तर त्यामध्ये रक्त मेंदू पर्यंत पोहोचण्यास अडचण येते, अडथळा येतो, रक्त मेंदू पर्यंत जात नाही आणि परिणामी मेंदूला कमी रक्ताचा पुरवठा होतो.

यावरती उपाय एकदम सोपा आहे फक्त साडेतीन मिनिटांचा हा उपाय आहे. ज्यावेळी तुम्हाला जाग येईल त्यावेळी तुम्ही लगेच उठून बसू नका, जाग आलेली असेल तर जिथे झोपलेले असाल तिथे आहे त्या position मध्ये तसेच झोपून राहा फक्त 30 सेकंद पर्यंत आणि त्यानंतर उठून बसा फक्त 30 सेकंद आणि जर पलंगावर झोपलेले असाल तर पाय खाली सोडून तसेच 2 ते 2.30 मिनिटे तसेच बसून राहा. आता आपले साडेतीन मिनिटे झालेली आहेत आणि आपण लघवीला जाऊ शकतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *