केस एवढे वाढतील कि सांभाळणे कठीण होऊन जाईल…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला केसांच्या विषयीची माहिती सांगणार आहोत, केसांच्या खूप समस्या असतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत, त्यापासून तुम्ही घरीच तेल तयार करू शकता आणि त्या तेलामुळे तुमचे केस वाढतील. तर चला मित्रांनो आपण त्या तेला विषयी अधिक माहिती तेल तयार करण्याची कृती देखील जाणून घेऊ. हे तेल तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची ओळख करून घेऊया, 1.  कडीपत्ता, 2. जास्वंदाची पाने, 3. नागवेलीची पाने, कढई आणि कोकणट तेल तर ह्या सर्व साहित्याचा वापर करून आपण तेल बनवणार आहोत…

त्या अगोदर ह्या साहित्यांची थोडी माहिती जाणून घेऊ. कडीपत्ताची पाने:- यामध्ये Protein, Beta carotene, हे घटक असतात याच्यामुळे आपल्या केसांची जी गळती होते ती गळती थांबवण्यास कडीपत्ता उपयुक्त ठरतो. म्हणूनच आपण याचा वापर करणार आहोत. जास्वंदीची पाने:- यामुळे केसांची मोठया प्रमाणात वाढ होण्यास मदत होते आणि केस मुलायम आणि तजेलदार होतात, म्हणूनच आपण याचा वापर करणार आहोत. नागवेलची पाने:- यामध्ये आपल्या केसांची वाढ होण्याचे घटक आहेत यामुळे आपण याचा वापर करणार आहोत. तर चला मित्रांनो याची कृती जाणून घेऊ, सर्वात प्रथम सर्व पानांचे बारीक तुकडे करून घ्या, त्यामध्ये 7 ते 8 कडीपत्त्त्याची पाने, जास्वंदीची दोन पाने, नागवेलीची दोन पाने आणि 50ml कोकनट तेल घ्यायचे आहे.

पानांचे तुकडे करून झाल्यानंतर सर्व प्रथम एक गॅसवरती कढई ठेऊन घेऊ, आणि त्या कढईमध्ये 50ml कोकणट तेल ओतून घेऊ, नंतर हे तेल गरम करून घेऊ आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पानांचे जे छोटे छोटे तुकडे कट केले आहेत, ते पानांचे तुकडे त्या गरम तेलामध्ये टाकून घेऊ, आणि ते सर्व व्यवस्तीत एकत्रित होईल असे हलवून घेऊ, आणि त्याचा रंग बदले पर्यंत ते एकत्रित हालवत जाऊ. आणि मित्रांनो जेव्हा तुम्हाला खात्री पटेल की ते सर्व चांगल्या प्रकारे एकत्रित झाले आहे तेव्हा ते गरम केलेले तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे. आणि ते थंड झाल्यानंतर ते तेल स्वच्छ गाळून घेऊ व ते तयार झालेले तेल कसे वापरायचे हे देखील सांगणार आहोत.

मित्रांनो आपण जे तयार केलेले तेल आहे ते 4 ते 6 महिने काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेऊ शकतो. आणि हे तेल आठवड्यातून 2 ते 3 दिवस वापरायचे आहे. आणि ते तेल किमान 2 ते 3 तास आपल्या डोक्याला असले पाहिजे. किंवा तुम्ही हे तेल रात्रभर केसाला लावून झोपू शकता.
मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ पाहून तेल बनवू शकता… व्हिडिओची लिंक https://youtu.be/wqRPVbtdkKs

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.