ऋतुराज संजय पाटील या दमदार यशस्वी युवकाचा आजपर्यंतचा जीवनप्रवास…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला “ऋतुराज संजय पाटील” या दमदार यशस्वी युवकाचा आजपर्यंतच्या जिवनप्रवासा विषयी माहिती सांगणार आहोत, तर चला मित्रांनो त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. “ऋतुराज संजय पाटील” वारकरी संप्रदायातील पाटील घराण्याची चौथ्या पिढीत सुद्धा तितक्याच सहजतेनं पुढे नेहणार युवक. Dr. D. Y. Patil यांनी संस्था उभ्या करून हजारो कुटुंबांना हातभार लावला, हे काम अधिक व्यापक करत डॉ. संजय डी. पाटील आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिक्षण शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण, या सर्वच क्षेत्रात काम केलं.

ऋतुराज संजय पाटील यांनी पुढे चैफेर कामातून आपली एक स्वतंत्र ओळख तयार केली आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच ट्रॅडिशनल डे, सतेश युत फेस च्या माध्यमातून युवा पिढीला त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलंय. अमेरिकेतील पेन्सइव्हेनिया  या विद्यापीठांनमधून ग्लोबल बिजनेस मॅनेजमेंट या विषयात कोर्स पूर्ण केल्यानंतर कोल्हापूर मध्ये हॉटेल सयाजी या पहिल्या पंच तारांकित हॉटेलची उभारणी केली. हे हॉटेल आज कोल्हापूरच्या पर्यटन वाढी बरोबरच सेवा व्यवसाय आणि उद्योक वाढीसाठी एक कॅटलिस्ट म्हणून काम करत आहे. सयाजी च्या माध्यमातून एक हजाराहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या शाश्वत रोजगार उपलब्ध झाले आहेत. गेल्य 12 वर्षांपासून ऋतुराज समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

 

शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंटना कौनसिलिंग निवडणुकांमध्ये सहभाग घेत सर्व सामान्य युवक युवतींना चेअरमन पदाची संधी देत, आपल्यातील संघटन कौशल्याची झुळूक त्यांनी दाखवली आहे. कोल्हापूर महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती, गोकुळ दूध संघ, राजाराम कारखाना या निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्यातील संघटन कौशल्याचा खुबीने वापर केला. ऋतुराज DY Patil group चे ट्रस्टी म्हणून वेगळं व्हिजन ठेऊन काम करीत आहेत. स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी नेहमीच पाठबळ दिलं आहे.

आपल्या कामातून त्यांनी कला, क्रीडा, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. पर्यावरण रक्षणासाठीच्या वृक्षरोपन मोहिमेचे त्यांनी आयोजन केले आहे. पन्हाळा, जोतिबा, राजाराम बंधारा, या सह कोल्हापूर शहरात राभवलेल्या स्वच्छता मोहिमांसह कोल्हापूर उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. महापुराच्या काळात त्यांनी दिवसरात्र झपाटून मदत कार्य केले आहे. DY Patil Hospital च्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन पूरग्रस्तांना मदत वाटप यासह सगळ्या आघाड्यांवर त्यांनी अथक पणे काम केलं. यासह त्यांनी अनेक क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून दिले आहे.

मित्रांनो असे आहे ऋतुराज संजय पाटील या दमदार यशस्वी युवकाचा आजपर्यंतचा जीवन प्रवास, मित्रांनो तुम्हाला ऋतुराज संजय पाटील यांच्या बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.