अनेक रोगांना मिनिटात दूर करतो कापूर, जाणून घ्या याचे जादुई फायदे काय आहेत

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला कापराचे घरगुती फायदे कोणते  आहेत त्या बद्दल थोडी माहिती सांगणार आहोत, मित्रांनो कापूर हा फक्त आपण पूजे साठी वापरतो, पण त्या व्यतिरिक्तही कापराचे बरेच फायदे आहेत. मित्रांनो जर तुम्हाला भाजले असेल तर कापूर किंवा कापराचे तेल लावावे त्यामुळे जळजळ दूर होईल, संसर्गाचा धोका देखील टळेल. घरात कापराचा धूर केल्याने जंतू नष्ट होतात आणि त्यामुळे आजारांचा संसर्ग देखील होत नाही. दात दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्वरित आराम मिळतो.

घरात सुगंध दरवळत रहावा यासाठी रूम फ्रेशनर ऐवजी कापूर वापरावा, कापराची वडी जाळून ठवल्याने घरामध्ये सुवास नक्कीच पसरेल. पाण्यामध्ये कापराच्या तुकड्यांची पूड मिसळावी आणि ते पाणी घरात सगळीकडे शिंपडावे त्यामुळे घरामध्ये मुंग्यांचा त्रास कमी होईल. तुमच्या घरामध्ये जर ढेकणांचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून ते बिछान्यात ठेवाव. पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. जर तुमचा कान दुखत असेल तर तुळशीच्या पानांच्या रसात कापूर विरघळून थोडेसे  कोमट करून ते कानात घालावं, त्यामुळे कान दुखी कमी येईल.

स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालीश करावी त्यामुळे वेदना थांबतील आणि आराम देखील मिळेल. जर त्वचेला खाज येत असेल तर ज्या भागावर खाज येत आहे, तिथे कापूर लावल्याने खाज येणे बंद होतं. केसात कोंडा झाल्यास आवळ्याच्या तेलात कापूर मिसळू डोक्याला लावा त्यामुळे कोंड्याचा त्रास नक्की कमी होईल. गरम पाण्यामध्ये थोडंस कापूर आणि मीठ घालावं यामध्ये थोडा वेळ पाय ठेवावेत’ या नंतर स्क्रब करून मॉइश्चराइझ क्रीम लावावी यामुळे पायांच्या भेगांची समस्या दूर होईल. ऑलिव्ह ऑइल मध्ये कापूर मिसळून डोक्याची मालिश करावी, यामुळे ट्रेस आणि डोकेदुखीची समस्या दूर होईल.

तर मित्रांनो हे आहेत कापराचे घरगुती फायदे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.