रितेश देशमुखचे लहान भाऊ धीरज देशमुख यांची पत्नी आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याची बहीण…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला रितेश देशमुख यांचे लहान भाऊ धीरज देशमुख यांच्या पत्नी विजयी माहिती सांगणार आहोत, आम्हीआशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडेल. “विलासराव देशमुख” हे नाव म्हंटलं की महाराष्ट्राचा एक उत्तम माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. एक सय्यमी आणि धडाडीच नेतृत्व अशी ओळख त्यांनी राजकीय क्षेत्रात निर्माण केली होती. देशातील केंद्रीय मंत्री मंडळातही त्यांनी मंत्री पदाचा कारभार सांभाळलेला आहे.

हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे दुर्दैवाने दुःखद निधन झालं. काँग्रेस पक्षातील आघाडीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला आणि देशमुख कुटुंबाला एक धक्काच बसला, त्यानां तीन मुले आहेत. त्यापैकी सर्वात लहान चिरंजीव म्हणजे “धीरज देशमुख” धीरज देशमुख 2019 ची विधानसभा निवडणूकीतून निवडून आले आहेत. म्हणून आज आपण त्यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत, धीरज देशमुख यांचा जन्म 6 एप्रिल 1982 रोजी लातूर मध्ये झाला. आज त्यांचे वय 37 वर्षे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव विलासराव देशमुख आणि त्यांच्याआईचे नाव वैशाली देशमुख त्यांना दोन मोठे भाऊ देखील आहेत. सर्वात मोठा भाऊ अमित देखमुख हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. तर दुसरा भाऊ रितेश देशमुख हे Bollywood आणि मराठी industry मधील एक सुपरस्टार अभिनेते आहेत.

दोन्ही भावांची लग्ने झाली आहेत, रितेश देशमुख यांनी अभिनेत्री जेनीलिया बरोबर लग्न केले आहे. धीरज देशमुख यांचा देखील विवाह झाला आहे, धीरज यांनी Bollywood मधील अभिनेते जॅकी भगनानी यांच्या बहिणीशी विवाह केला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव दिपशिक उर्फ हानी असे आहे, दिपशिक ह्या चित्रपट निर्मात्या असून त्यांना एक मुलगा देखील आहे. वंश धीरज देशमुख असे आहे, धीरज देशमुख यांचे शालेय शिक्षण हे लातूर मध्ये पूर्ण झाले आहे. पुढे उच्चशिक्षण घेण्यासाठी ते परदेशात गेले, त्यांनी लंडन मधून “एम बी ए” पूर्ण केले. त्यांना क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो, या खेळा विषयीच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी ते आपल्या भाषणात सांगत असतात.

लंडन हून “एम बी ए” केल्यानंतर ते परत घरी ही परतले, परत आल्यानंतर राष्ट्रीय क्षेत्रात लक्ष घालण्यास त्यांनी सुरवात केली. 2014 ला लातूरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली, युवक काँग्रेस अध्यक्ष पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 2014 ला लोकसभा निवडणुकीत प्रचाराला त्यांचा सहभाग होता, धीरज देशमुख यांनी पहिली निवडणूक जिल्हा परिषदची लढवली त्यांनी ही निवडणूक लातूर मधील एकुरका गटातून लढवली आणि ते विजयी देखील झाले.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

One Comment on “रितेश देशमुखचे लहान भाऊ धीरज देशमुख यांची पत्नी आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याची बहीण…”

Leave a Reply

Your email address will not be published.