अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलाचं काम पाहून तुम्ही पण चकित व्हाल!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुला विषयी थोडी माहिती सांगणार आहोत. आणि मित्रांनो त्यांचा मुलगा जे काम करत आहे ते जर तुम्हाला समजले तर नक्कीच तुम्ही चकित व्हाल, तर चला मित्रांनो त्याच्या विजयी अधिक माहिती जाणून घेऊ. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दिग्गज मराठी कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टी खूपच गाजवली, बऱ्याच वर्षांनंतर निवेदिता सराफ यांनी मराठी काळविश्वात एन्ट्री केली आहे.

झी मराठी वरील आग बाई सासूबाई या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेला झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत. या मालिकेत निवेदिता सराफ या सासूबाई म्हणजेच असावरीची मुख्य भूमिका साकारत आहेत, आपल्या सहज सोप्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. तर आज आपण आग बाई सासूबाई मालिकेत असावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या परिवाराबद्दल जाणून घेणार आहोत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एकुलता एकच मुलगा आहे, त्याचे नाव “अनिकेत सराफ” असून सर्वजण त्याला “निक” या नावाने ओळखतात.

निवेदिता सराफ यांनी निकच्या जन्मानंतर सिनेमा सृष्टीतून काढता पाय घेतला. मुलाच्या जन्मानंतर 14 वर्षे त्या मराठी कलाविश्वात त्या आपल्याला कधीच दिसल्या नाहीत. त्यांना आपल्या मुलासाठी वेळ काढून तो वेळ त्याच्या सोबत घालवायचा होता, आता हा अनिकेत खूपच मोठा झाला असून तो आता असे काही करतोय ते ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. खर पाहायला गेलं तर अभिनेतेची मुलं देखील अभिनेतेच होतात असे आपण पाहिले आहे, परंतु खूपच कमी अशी मुलं आहेत जी स्वतःचे विश्व स्वतः निर्माण करू पाहत आहेत. त्यातीलच एक म्हणजे अशोक आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ….!!

अनिकेत सराफ हा शेफ आहे त्याने मुंबईच्या दादर केटरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतल्या नंतर पुढील शिक्षणासाठी तो फ्रांस ला गेला. तिथे गेल्यानंतर त्याने पाक कला कृतीचे शिक्षण घेतले, आणि संपल्यानंतर परत तो भारतात आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो आता नेमके काय करतो? तर तो आता त्याच्या रेसिपीचे व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चैनल वरती अपलोड करतो. ती 4 ते 5 वर्षांपासून हे काम करत आहे त्याच्या चैनल चे नाव गेट करिन्ड असे आहे. या चैनल वर 10 लाखांपेक्षा ज्यास्त सबक्रायबर आहेत.

आई वडिलांच्या विश्वात जगणं खूप सोपं असतं, म्हणून सर्वजण आपल्या आई वडीलांच्या पायावर पाय ठेवत त्यांच्या विश्वाला आपले विश्व मानतात परंतु अनिकेतने सर्वांच्या पेक्षा हटके काही तरी करून दाखवले आहे. मित्रांनो अनिकेतच्या या हटके पणाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

One Comment on “अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलाचं काम पाहून तुम्ही पण चकित व्हाल!”

Leave a Reply

Your email address will not be published.