संभाजी महाराजांना वाचवण्याचा एकमेव प्रयत्न – जोत्याजी केसरकर…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजां जेव्हा कैद करण्यात आले तेव्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मावळ्यांविषयी माहिती सांगणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊ त्या विषयीची अधिक माहिती. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या मृत्यू नंतर तब्बल नऊ वर्षे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात गोंगावणार वादळ, पण याच पराक्रमी वादळाला आणि स्वराज्याच्या छत्रपतींना मुकर्रबखानाने दगा फटका करून आणि फितुरांच्या मदतीने संगमेश्वरमध्ये कैद केले.

संभाजी महाराज पकडले गेले ती तारीख होती “1 फेब्रुवारी 1689” पण साडे तीनशे वर्षे झाली, लाखो लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत संभाजी महाराज तर स्वराज्याचे छत्रपती मग संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का बरं झाला नाही? संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते? संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी एकाही मावळ्याने प्रयत्न केले नाहीत का? तर मित्रांनो तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, “होय…!!” संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला होता. मग कोणी केला हा प्रयत्न? कोण होता तो जिगरबाज मावळा? छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावरती मुकर्रबखानाने आपल्या सैन्यांना आदेश दिला “जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजींना संगमेश्वरातून बहादूर गडाकडे घेऊन चला…!”

मुकर्रबखानाची हजारोंच्या फौज निघाली, संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जानारी ही सैन्याची तुकडी 32 शिराळाच्या जवळ आली. त्याचवेळी एका स्वामिनिष्ट मावळ्याला कळालं आपला राजा कैद झालाय ही बातमी ऐकून त्याच्या काळजाच अक्षरशः पाणी पाणी झालं…..!! त्या मावळ्याच नाव होत “जोत्याजी केसरकर” जोत्याजींना काही कळेना, काहीही करून राज्यांना वाचवले पाहिजे. जोत्याजींना आपल्या जवळचे मावळे गोळा केले भरले उरे-पुरे 100 मावळे ते शंभर मावळे घेऊन जोत्याजी मोघलांवर तुटून पडला. आपल्या राज्याला सोडवण्यासाठी जीवावर उधार होऊन हे मावळे सपासप तलवारी फिरवत होते.

जोत्याजी वाऱ्याच्या वेगानं गणिमांना कापत सुटला होता. पण मोघलांच्या हजारोंच्या फौजे समोर 100 मावळ्यांच बळ तोकड पडलं आपल्या राज्याला वाचवण्यासाठी जिवाच्या आकांकताने लढणारे मावळे कापले गेले. जोत्याजींच्या सर्व अंगावर तलवारीचे वार झाले त्या शिराळाच्या जंगलातील झाडा झुडपात मावळे कोसळले….!! आणि संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न अखेर अपयशी ठरला. आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या छोट्याश्या गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या जोत्याजी केसरकरांची समाधी आपल्यास पाहायला मिळते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.