गर्भावस्थेत नवरा जवळ असणे का जरुरीचे असते या सत्यघटनेवरून लक्षात येईल !

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती,आज आम्ही तुम्हाला एक घडलेली घटना सांगणार आहोत, जेव्हा स्त्री गर्भावस्थेत असते, त्यावेळी नवरा जवळ असणे का जरुरीचे असते. ते जाणून घेणार आहोत, आज 2 दिवस झाले होते बाळाने काहीच हालचाल केली न्हवती, सातव्या महिन्यात असे काही होणे बरे नाही. आरोहिचा जीव वर खाली होऊ लागला होता, नवऱ्याला कळवू पण शकत न्हवती, नवरा परदेशात जहाजेवर होता. नेटवर्क नसल्यामुळे काहीच संपर्क होऊ शकत न्हवता, आरोहिने WhatsApp वरती खूप सारे message टाकून ठेवले होते. Network मध्ये आले की दिसतील आणि लागलीच कॉल येईल अशी तिची अपेक्षा होती.

दिवसभर फोन ची वाट बघितली पण फोन काही आला नाही. काय करावे काही कळेना, मग तिने सासूबाई बरोबर हॉस्पिटलमध्ये जायचे ठरवले. जीव अगदी टांगणीवर लागला होता, पहिलेच बाळ त्यात असल्या प्रॉब्लेम आणि त्यात सर्वात महत्वाची म्हणजे नवरा घरी नाही….!! आरोहिचा नंबर आला ठोके वाढू लागले, डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितली, सगळे चेकअप झाले बाळाच्या हृदयाचे ठोके कमी ऐकायला येत होते डॉक्टरांनी अजून एक दोन दिवस वाट बघायला सांगितले. “होतं कधी कधी असे खूपदा बाळ झोपले असले की हालचाल होत नाही, असे म्हणून डॉक्टरांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. एक दोन दिवसात हालचाल नाही झाली तर लगेच सोनोग्राफी  करून घेऊ, मग बगू काय करायचं एवढं बोलून डॉक्टर राउंडला निघून गेले.

आरोहिला खूपटेन्शन आले होते सासूबाई मात्र समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तिचे मन मानत न्हवते काय करू?, बाळाला काही झाले तर? हे पण नाही ती सतत बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती, पण काहीच हालचाल होईना. येर्वी बोलले की लगेच हालचाल होत होती बेल, कुकरची शिट्टी, गाणी देवघरातील घंटी हे सगळे आवाज खुप प्रिय होते…! ऐकताच उड्या मरणे सुरू व्हायचे, तिने सगळे उपाय करून बघितले पण काहीच प्रतिसाद मिळेना. एक दिवस निघून गेला आरोहिला टेंशन मुळे रात्री झोप लागेना सकाळची कामे आटोपली, आरोही मोबाईलवर असेच फोटो बघत असताना अचानक International नंबर वरून फोन आला तिने लगेच उचलला…! काय ग काय झाले आहे?

आवाज ऐकताच तिच्या डोळ्यातून भरभर अश्रू आले, आरोही म्हणाली काय हो तीन दिवस झाले तुम्ही एक फोनही केला नाही, मी किती टेंशन मध्ये आहे तुम्हाला काही कल्पना तरी आहे काय?, आग मी तरी काय करू मी शिप वर होतो मी असाह्य होतो मला माहिती होते, तू वाट बघत असशील म्हणून मी पोर्ट वर पोहोचल्या बरोबर तुला फोन केला. रडू नको आधी काय झाले आहे ते सांग आणि तेवढ्यात बाळाने जोरदार लाथ मारली आणि आरोही मोठ्याने किंचाळली…!! “आग ये वेडी झाली आहेस काय?” माझा जीव घेणार आहेस काय? आरोही अजून रडू लागली, आग बोल काही तरी माझा बी.पी. वाढतोय. आरोही रडक्या सुराने बोलली “मी सगळं करून बघितलं पण बाळ काहीच हालचाल करीत न्हवते तुमचा आवाज एकताच उड्या मरण सुरू झालंय, दोघेही खूप रडू लागले.

मित्रांनो बाळ जरी आईच्या गर्भात असले तरी बाळाला आपल्या बाबांचा गंध ओळखता येतो बाळ नऊ महिने आईच्या गर्भात आणि बाबांच्या हृदयात वाढतं, मित्रांनो बाबा नेहमीच मुलींच्या सगळ्यात जवळची व्यक्ती असते बाबांशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.
मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

One Comment on “गर्भावस्थेत नवरा जवळ असणे का जरुरीचे असते या सत्यघटनेवरून लक्षात येईल !”

Leave a Reply

Your email address will not be published.