वडिलांनी सगळी संपत्ती मुलांच्या नावे केली, त्यानंतर आई वडिलांची अवस्था पाहून रडू येईल.

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला एक घटना सांगणार आहोत जे वाचून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल, तर चला मित्रांनो ते जाणून घेऊ.  मी “एस टी” ने प्रवास करीत असताना एक आजी जवळ बसलो, आज्जी एस टी मध्येच जेवण करत होती. मी त्यांना विचारले आजी आज घरी जेवण करायला वेळ मिळाला नाही का? आणि आजीने तिची करून कहाणी संगायला सुरवात केली, काय करावं मस एकाला तीन ल्याक आहेती लेकरा पण काय करावं लग्न झाली आणि हळद वळायच्या आत समदे नंदीबैल झाले.

सुनांच पटना म्हणून येगल्या चुली करून दिल्या आणि ह्यो भोग लागला. आपल्याच आडात पाणी नाय तिथं नुस्त्याच काळश्या आपटून फायदा काय, लेकीस्नि फुटतो पानेव पण त्या पडल्या दुसऱ्यांच्या दावणीला. म्हाताऱ्यान हुत न्हवत ती तिघात वाटून दिल आणि आता बसलंय इट्टला इट्टला करीत दमा ब्लड प्रेशर लागलंय मग आवशीदाला महाग, म्हणून काय करतूस? कोणच्या तरी जलमाच पाप फेडायच असेल म्हणून भोग हाय म्हणायचं अन चालायचं, दुसरं काय?, ह्यांनी पेकाट दुमत हुईस्तवर हमाली करून घरदार उभं केलं, पोरास्नि रिक्षा, टमटम घेऊन दिल…!!

वाटलं म्हातारपणी टामटुमित दिवस घालवू, पण कशाचं काय न कशाचं काय…! आता म्हाताऱ्याला ऐकायला येत नाय आणि दिसायचं पण कमी आलंय, मी जाते मपली मंडय लोटाय-झाडाय, घरला गेलं की बायांच्या तोंडाला म्हामुर येतोय. त्यांची चबाड-चबाड ऐकून गिळवतच नाय, म्हणून तर पेम्टीतच खाते चार घास. तुझ्यावाणी भेटतो कोणी तरी बोलणार मग जातो एकदा घास ज्यास्त बर झालं म्हातार किवंन्डं झालंय, नायतर पळून गेलं असतं इट्टलाकडं म्हातार हाय तवर काढायचा कड कसा तरी त्याच्या माघारी कश्याला रहायचं र बाबा….!

मित्रांनो ज्या आई बाबा ने आपल्याला लहानाच मोठं केलं आपल्याला हवे नको ते सर्व पाहिले त्या आई वडिलांना म्हातारपणी तरी व्यवस्तीत सांभाळाव एवढीच मापक अपेक्षा असते आई वडिलांची, मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.