बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय? नक्की वाचा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, रात्रीचे 12 वाजले होते नवरा उशिरा घरी आला, बायको रागावली होती बायको म्हणते “कोठे होता दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.” नवरा म्हणतो “अग ते आपलं हे”, बायको नवऱ्याचे “त त फ” ऐकून आणखी रागावून बोलली “आता का गप्प सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात.?” आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारटी वाळवटी कोणाची?  नवरा थोडा धीर जमवून “अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो.”

बायको म्हणते काय कश्याला आणलत तुमच्या आईला इथे…!! तुमच्या भावांकडे सोडायचे होते कि तीला, आई बिचारी दरवाज्याच्या बाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही, संतापलेली बायको त्याच्याकडे पाहत पण नाही. नवरा म्हणतो “आईला माझ्या भावांकडे सोडणे शक्य  नाही प्लिज समजून घे…!!” बायको म्हणते का आपल्या कडे कुबेराचा खजिना आहे, वाटतं तुमच्या दहा हजार पगारात आपलेच भागत नाही, आता आई कश्याला आणखी. नवरा निग्रहाने म्हणतो “आई इथेच राहील.” बायको “हो का मग या घरात एक तर ती राहील नाही तर मी..!! आणि ही पण निर्लज्य पणे आली इथे, काय व कश्याला आलात आमच्या संसारत विष कलवायला?” हे विचारत बायको बाहेरचा दिवा लावून दरवाजा बाहेर जाते.

मगाशी काळोखात उभ्या असणाऱ्या आईने डोळे पुसत पदर चेहऱ्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहून हादरलेली बायको दोन पाऊले मागे सरते आणि म्हणते “आई तू..?”, आई म्हणते हो मीच तुझ्या भावांनी आणि त्याच्या बायकांनी मला खुप छळलं आणि मला घरा बाहेर काढलं मी जावई बापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्ह्यायला आले. आपल्या आईची कहानी ऐकून क्षणभर सुन्न होते डोळे पाण्याने डबडबतात पण क्षणात डोळे पुसून नवऱ्याकडे लाडकटाक्ष टाकत बायको म्हणते “तुम्ही पण ना अगदी असे आहात जा बाई किती दिवसांनी इतकं छान सरप्राईज दिलं…!! थँक्स” चल आई दमली असशील जेवून घे गरमागरम, पण मित्रांनो नवऱ्याच्या आईच काय?

आजच्या मुलींनी यावर विचार करायला हवा, कारण मुलगा लग्न झाल्यावरच का आई पासून वेगळा होतो? मित्रांनो आम्ही हात जोडून विनंती करो, आई-वडीलांपेक्षा ज्यास्त किंमत जगात कोणालाच देऊ नका. आजची मुलगी उद्याची आई आहे, उद्याची आई हीच कोणाची तरी सून आहे, सून हीच कोणाची तरी सासू आहे, मग तुमच्यावर ही वेळ येईल आयुष्यात दोनच गोष्टी मागा आई वडीलांशिवाय घर नको आणि कोणतेही आईवडील बेघर नको…..!! मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.