धनंजय मुंडे यांना मोठा धक्का.. बँकेची घरावर जप्तीची कारवाई…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मित्रांनो या वेळच्या विधानसभा निवडणुकीत परळी मधून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक रित्या पराभव करणारे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनाच आता एक मोठा धक्का बसला आहे. मित्रांनो धनंजय मुंडे त्यांच्या पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्या मुळे बँकेने त्यांचा फ्लॅट ताब्यात घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई करणाऱ्या या बँकेचे नाव आहे “शिवाजीराव भोसले सहकारी बँक.”

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पुण्यातील फ्लॅटसाठी या बँकेकडून “1 कोटी 43 लाख” रुपयांचे कर्ज घेतल होत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या कर्जाचा हप्ता ना फेडल्याने बँकेकडून ही जप्तीची कारवाही करण्यात आली आहे. त्या बरोबरच धनंजय मुंडे यांनी पुढील काही दिवसात जर बँकेचे पैसे दिले नाही तर त्यांच्या ह्या फ्लॅट चा निलाव ही होऊ शकतो.

मित्रांनो धनंजय मुंडे यांनी साधारणता साडे चार वर्षांपूर्वी पुण्यातील मॉडेल कॉलनीत हा फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅट मध्ये धनंजय मुंडे यांच्या मुली राहतात, त्या सध्या पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे. पण मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडला असेल की या बँकेवर धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, मग त्यांच्याच पक्ष्याच्या नेत्यावर अशी कारवाही का केली गेली. तर मित्रांनो या मागे खूप मोठे कारण आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक ह्या बँकेचे सध्या परिस्थिती खूप वाईट आहे, या बँकेतील अनेक कर्ज NPA मध्ये गेले म्हणजेच बँक मध्ये कर्ज बुडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे किंवा ते परत ना मिळाल्यामुळे प्रमाण वाढल्या मुळे RBI ने या बँकेवर निर्भन्ध लादले आहेत. या बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच RBI ने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागेवर प्रसासकाची नेमणूक केली आहे.

शिवाजीराव सहकारी बँक ने आत्ताबल 310 कोटींचे कर्ज वाटली त्यापैकी 294 कोटी रुपयांचे कर्ज बुडीत आहे, म्हणजेच ते सर्व NPA मध्ये गेली आहेत. यात धनंजय मुंडे यांचे ही एक कोटीचे कर्ज आहे आणि या संबंधिची नोटीस बँकेने वर्तनमान पत्रात देखील छापली होती, यात धनंजय मुंडे यांचे नाव दिसत आहे. पण मित्रांनो त्यांच्या फ्लॅट  वर अशी जप्ती आल्याने धनंजय मुंडे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणतात की हा एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे.

गेल्या महिन्यात बँकेकडून नोटीस आली होती, पण मी निवडनूकीच्या प्रचारात व्यस्त होतो त्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की 30 अक्टोंबर नंतर मी कर्जाची रक्कम भरू शकतो. याशिवाय मागील काही काळात पैश्याची अडचण निर्माण झाल्याने मी बँकेचे हप्ते भरू शकलो नाही. पण मी ते कर्ज फेडणार असल्याचे बँकेला कळवले देखील होत, पण त्या आधीच बँकेकडून कारवाही करण्यात आली आहे. तर मित्रांनो अश्या प्रकारे धनंजय मुंडे यांची त्यावर प्रतिक्रिया आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.