उदयनराजेंच्या पराभवाची ६ कारणं…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकीच्या निकाला विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत, मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला आहे, पण तुम्हाला हे माहीत आहे का की त्यांचा पराभव होण्याची कारणे कोणकोणती आहेत, तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया उदयनराजेंच्या पराभवाची 6 कारणे. उदयनराजे यांना सातारच्या जनतेने का डावललं त्याची सहा करणे नेमकी कोणती आहेत ते जाऊन घेऊयात,

ज्या विचार सरणीला फुले, शाहू, आंबेडकर किंबवना छत्रपती शिवाजी महाराज यांनी विरोध केला त्याच विचार सरणीच्या पक्षामध्ये उदयनराजे भोसले यांनी प्रवेश केला आणि ते सातारच्या जनतेला रुचले नाही…जेव्हा उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला तेव्हा सोशल मीडियावर काही प्रतिक्रिया अश्या देखील आल्या की “राजे तुम्ही पेशवाई मध्ये सहभागी झाले आहात ज्या पेशवाईला छत्रपती शिवाजी महाराज यांचा विरोध होता….!!” हे झाले पहिले कारण, दुसरे कारण म्हणजे उदयनराजे भोसले यांची सताऱ्यामध्ये मागच्या काही काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये झालेली वर्तवणूक…!! राजकारणातील अनेक नेते आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक मद्यपान करत असतील पण उदयनराजे भोसले यांचे मद्यपान हे साताऱ्यामध्ये बरेच गाजलं दारूपिऊन उदयनराजे भोसले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलखात तर ट्रेंड झाली होती. राष्ट्रवादी मध्ये जोपर्यंत उदयनराजे भोसले होते, तोपर्यंत या विषयावर पांघरूण घातले होत, मात्र भारतीय जनता पार्टी मध्ये आल्यानंतर जनतेमध्ये उदयनराजे भोसले यांच्या दारू पिण्याचा विषय देखील चर्चेमध्ये राहिला. आणि उदयनराजे भोसले यांची वर्तवणूक देखील सातारच्या जनतेला रुचली नाही.

कारण नंबर तीन, पंधरा वर्षे उदयनराजे भोसले यांच्या हातामध्ये सत्ता होती मात्र त्यावेळी त्यांना विकास करता आला नाही. मला राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आढवलं आढावा आणि जिरवा अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली असे उदयनराजे भोसले यांनी खुलासा केला, आणि विकासासाठी मी भारतीय जनता पार्टी मध्ये आलोय असे मत उदयनराजे भोसले यांनी पक्षांतरांच्या वेळी म्हटल  मात्र उदयनराजे भोसले यांची ही भावना देखील साताराकरांना रुचली नाही. अर्थात उदयनराजे भोसले यांनी मान्यच केलं की गेल्या पंधरा वर्षांमध्ये सातारचा विकास मी करू शकलो नाही. चौथे कारण 2019 च्या लोकसभेला उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कडून तिकीट मिळवलं आणि ते जिंकून देखील आले, अर्थात त्यांचं मताधिक्य घटलं होत मात्र विजय त्यांना मिळाला होता. असे असताना देखील त्यांनी तीन महिन्यातच भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी खसदरकीचा राजीनामा दिला, जर भारतीय जनता पार्टीमध्येच जायचं होतं तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदारकी लढवलीच कशाला असा प्रश्न सातारकरांमध्ये उपस्थित झाला आणि त्यामुळे सातारकरांना उदयनराजे भोसले यांचा हा निर्णय आवडला नाही.

पाचवे कारण म्हणजे उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्ह्यामध्ये असलेली एकाधिकारशाही सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदार संघ आहेत, आणि या आठही विधानसभा मतदार संघामध्ये कोणा न कोणा व्यक्तीसोबत उदयनराजे भोसले यांच खटकलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उदयनराजे भोसले यांना 2019 ला लोकसभेच तिकीट देऊ नये यासाठी अनेकांनी शरद पवार यांच्या घराचे उंबरे झिजवले पण पवार यांनी उदयनराजे भोसले यांना आणखी एकदा संधी दिली होती. आणि ही उदयनराजे भोसले यांची एकाधिकारशाही देखील उदयनराजे भोसले यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. आणि शेवटचे कारण म्हणजे शरद पवारांनी सातारची पाऊसामध्ये सभा गाजवली आणि भावनिक आव्हान जनतेला केलं की 2019 च्या लोकसभेला माझ्याकडून चूक झाली मी ती मान्य करतो मात्र आता ती चूक सुधरवायची आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये स्वच्छ चारित्र्याचे IAS अधिकारी राहिलेले श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी कडून उमेदवार राहिले आणि ही राष्ट्रवादीची मजबूत बाजू राहिली. वर्षानुवर्ष शरद पवार यांचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्यावरती मजबूत पकड राहिलेली आहे आणि शरद पवार यांनी घातलेली साद सातारकरांना मान्य केली आणि उदयनराजे भोसले यांचा पराभव त्या ठिकाणी बघायला मिळाला.

या व्यतिरिक्त उदयनराजे भोसले यांच्या पराभवाची कोणती कारणे आहेत किंवा आम्ही सांगितलेल्या कारणांना तुम्ही सहमत आहात का तुमचे मत प्रतिक्रिय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.