पंकजा मुंडे यांचा परळीमध्ये पराभव का झाला?

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकीच्या निकाला विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत, मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की परळी मतदार संघात पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला?, तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊ या विषयी अधिक माहिती. परळी मध्ये झालेला पराभव पंकजा मुंडे यांनी मान्य केला आहे, आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन सुद्धा केलेलं आहे. त्याचवेळी त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की हा पराभव मी मान्य करते. पण पंकजा मुंडे यांचा हा पराभव का झाला याची कारणे आपण शोधणार आहोत.

पहिले कारण म्हणजे पंकजा मुंडे यांच्या सार्वजनिक वावर आणि वक्तव्य की ज्या पद्धतीने त्या भावनिक राजकारण करत होत्या, ते लोकांना या निवडणुकी मध्ये लोकांना आवडले नाही. हे सगळ्यात पहिले कारण आपल्याला सांगता येईल. निवडणुकीच्या आधी म्हणजेच मतदान होण्याच्या दोन दिवस आधी प्रचार संपल्यानंतर एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्या क्लिप च्या माध्यमातून भावनिक राजकारण पुन्हा एकदा परळी मध्ये चालू होत. पण लोकांनी या भावनिक राजकारणाला साध घातलेली नाही, असे आपल्याला दुसून येऊ शकत. हा झाला पहिला मुद्दा…!!

दुसरा मुद्दा असा आहे, की पंकजा मुंडे यांनी केसमध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार असू शकणार होत्या त्या नविता मूंदड़ा यांना भाजप मध्ये आणले आणि त्यांना असे वाटले होते की नविता मूंदड़ा यांना भाजपमध्ये आणल्यामुळे त्यांची निवडणूक म्हणजे परळी मधील निवडणूक त्यानां सोपी जाईल, असे वाटले होते कारण अंबा जुगाई मध्ये नविता मूंदड़ा यांचे सासरे नंदकिशोर मूंदड़ा यांचा चांगला प्रभाव आहे, त्यांची एक वोट बँक आहे आणि त्यांची वोट बँक आपल्याला कामी येईल. असे पंकजा मुंडे यांना वाटले होते, पण तो सुद्धा फायदा त्यांना निवडणुकीत झालेला दिसून येत नाही.

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अँटिंगकमनसी सुद्धा म्हणता येऊ शकते, सतत सत्ते बरोबर असल्यामुळे सतत दहा वर्षे तिथे आमदार असल्यामुळे सुद्धा त्याचा तोटा त्यांना तिथे सहन करावा लागलेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही भावा बहिणीच्या भांडणाचा उबग सुद्धा लोकांना या निवडणुकीमध्ये किंवा परळीत लोकांना आलेला असू शकतो, हे असं या निकाला वरून आपल्याला नक्की सांगता येऊ शकत. आणखी एक मुद्दा सांगता येऊ शकतो तो म्हणजे राजकारण्यांची लोकांना गृहीत धरण्याची वृत्ती…!! पंकजा मुंडे यांनी तिथल्या मतदारांना गृहीत धरले आणि त्यामुळेच तिथल्या मतदारांनी त्यानां योग्य ती साथ दिली नाही असे काही राजकीय विश्लेषकांच सुद्धा म्हणणे आहे. काही राजकीय विश्लेषक असेही सांगतात की ही निवडणूक पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवरती झाली किंवा लोकांनी जे मतदान केलं ते स्थानिक मुद्य्यांवरती किंवा स्थिती वरती केलेले आहे. असे राजकीय विश्लेषकांच म्हणणे आहे त्याचे म्हणणे आहे की पंकजा मुंडे यांची लोकांसाठी असलेली अव्हेबिलिटी वरसेस धनंजय मुंडे यांची लोकांसाठी असलेली अव्हेबिलिटी किंवा कामाचा पूरक याची तुलना करता पंकजा मुंडे पेक्षा धनंजय मुंडे उजवे ठरतात आणि म्हणून लोकांनी धनंजय मुंडे यांना निवडले असे सुद्धा काही राजकीय विश्लेषकांच म्हणणे आहे.

मित्रांनो तुमचे या बद्दल काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.